रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांसोबत नुसरत जहाँचा फोटो, नेटकऱ्यांकडून प्रशंसा

Nusrat Jahn
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – सोशल मीडियावर पश्चिम बंगालमधील बशीरहाटच्या तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँचा फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवरून युजर्स नुसरत जहाँ यांची प्रशंसा करताना दिसत आहेत. या फोटोत एका फुगे विकणाऱ्या लहान मुलाला प्रेमाने जवळ घेऊन त्याचे चुंबन घेताना नुसरत जहाँ दिसत आहेत.

 

रस्त्यातून जाताना खासदार नुसरत जहाँ यांना फुगे विकणारा एक छोटा मुलगा दिसला. या मुलाशी त्यांनी प्रथम संवाद साधला आणि नंतर त्याला प्रेमाने जवळ घेत चुंबन घेतले. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना नुसरत जहाँ यांनी म्हटले आहे की, या फुगे विकणाऱ्या दिडवर्षांच्या मुलाने माझा विकेन्ड खास केला…जो फुग्यांपेक्षात कितीतरी सुंदर आणि रंगबिरंगी आहे. नुसरत जहाँचा हा फोटो आतापर्यंत ४० हजारजणांनी पाहिला असून अनेक युजर्सने त्यांची प्रशंसा केली आहे.
visit : npnews24.com