पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नाव नोंदणीला सुरुवात -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे : एन पी न्यूज 24 – पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नव्यानेच मतदार यादी करावयाची असल्याने प्रत्येकाने नव्याने मतदार नोंदणी करावयाची आहे. त्यानुसार सध्या मतदार नावनोंदणीला सुरुवात झाली असून  मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत 6 नोव्हेंबर 2019 आहेया मतदार नोंदणी कार्यक्रमात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक धिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणालेभारत निवडणूक आयोगाने पदवीधर व शिक्षक मतदार संघ मतदार याद्या तयार करण्याच्या संदर्भात सुधारित सर्वसमावेशक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करावयाच्या आहेत. तसेच दिनांक १ नोव्हेंबर२०१९ या अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या मतदार याद्या नव्याने करावयाच्या आहेतपूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले तरीसुध्दा अशा व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

visit : http://www.npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.