खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी

Compensation leave
14th October 2019

पुणे : एन पी न्यूज 24 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी  २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी- कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्यात यावीअसे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत असे कामगार उप आयुक्त विकास पनवेलकर यांनी कळविले आहे.

पुणे जिल्हा क्षेत्रातील दुकानेनिवासी हॉटेल्स,  खाद्यगृहनाट्यगृहव्यापारऔद्योगिक उपक्रम किंवा अन्य आस्थापनामाहिती तंत्रज्ञान कंपन्याशॉपिंग सेंटर्स,  मॉल्सरिटेल्स आदी आस्थापनांवरील कामगारकर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे कामगार आपल्या निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत  पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास दोन ते तीन तासाची सुटी देता येईल. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी मालकांनी घेणे आवश्यक असेल. या संदर्भात काहीही तक्रार असल्यास संबंधित कामगारांनी संपर्क साधावाअसे आवाहन कामगार  उप आयुक्त पुणे यांनी केले आहे.   

visit : www.npnews24.com