वस्तूंच्या पुनर्वापरावर भर दिल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होईल – मल्हार करवंदे, मुख्य कार्मिक अधिकारी, आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिटीव्ह

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत 'यशस्वी' संस्थेचे आयोजन.

0

पुणे : एन पी न्यूज 24 – कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करतानाच वस्तूंच्या पुनर्वापरावर भर दिल्यास कचऱ्याचे प्रमाण खूप कमी होऊ शकते असे मत आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिटीव्हचे मुख्य कार्मिक अधिकारी मल्हार करवंदे यांनी व्यक्त केले.

यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या शिवाजीनगर येथील संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आपण सर्वांनी रियुज, रिड्यूस व रिसायकल हा मूलमंत्र जपल्यास कचऱ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल, असे सांगतानाच प्लास्टिक वस्तू वापरण्यास अटकाव करून पर्यायी पर्यावरणास अनुकूल वस्तू वापरण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या स्वच्छता संदेश देणाऱ्या फलकांचे (पोस्टर) व प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केलेले आकर्षक पेन होल्डर व प्लास्टिक स्ट्रॉ पासून तयार केलेले वॉल हँगिंग, पुठ्ठयापासून तयार केलेले टिशू पेपर स्टॅन्ड या वस्तूंची पाहणी करून कौतुक केले.

तसेच आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिटीव्हतर्फे पुणे महानगरपालिका हद्दीतील आठशे किलोमीटर अंतराचा रस्ता दररोज स्वच्छ केला जातो असे सांगून शहरात ११० ग्ल्टन सक्शन मशिनतर्फे रस्त्याच्या कडेचा कचरा दररोज मशिनतर्फे गोळा केला जातो ही माहितीही मल्हार करवंदे यांनी दिली. यावेळी या ग्ल्टन सक्शन मशिनचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ व संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या केंद्र प्रमुख प्राची राऊत यांच्यासह सर्व प्रशिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.