आरोग्यासाठी घातक असणाऱ्या ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका

पुणे : एन पी न्यूज 24 –
मध
मधाच्या पोळ्यातून काढलेला मध तसाच खाऊ नये, कारण काही पोळ्याच्या मधामध्ये ग्रेयानोटॉक्सिन आढळून येते. याचे सेवन केल्यास शिथिलता आणि कमजोरी निर्माण होण्याची शक्यता राहते. यामुळे प्रक्रिया केलेला मध खाण्यासाठी वापरावा.
मशरुम
बऱ्याच जणांना मशरुम खाणं पसंत असते. मात्र मशरुम खाल्ल्यानं काहींना अॅलर्जीदेखील होते. कारण यामध्ये काही प्रमाणात विषारी पदार्थदेखील असतात. जे आरोग्यास हानिकारक आहेत.
शेंगदाणे
काही वेळेस रिकामा वेळ घालवण्यासाठी शेंगदाणे खाण्याची सवय असते. अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तीने शेंगदाणेचे सेवन करू नये. शेंगदाणे खाण्यापूर्वी याची अॅलर्जी तर नाही ना याची तपासणी करुन घ्यावी. कारण शेंगदाण्यांमुळे होणाऱ्या अॅनाफिलेक्सिस अॅलर्जीमुळे श्वसन नलिकेवर परिणाम होऊन एखादी व्यक्ती बेशुद्धी होण्याची शक्यता असते.
बदाम
बदाम दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे गोड आणि दुसरा हलका कडसर बदाम. एका शोधानुसार कडसर बदामामध्ये जास्त प्रमाणात हायड्रोजन सायनाइड आढळून येते, जे शरीरासाठी घातक ठरते.
बटाटा
बटाटे वडे, बटाट्याची भाजी जवळपास सर्वांनाच खाणे पसंत असते. मात्र बटाट्यावर असणारे कोंब आणि पानं विषारी असतात. यामुळे बटाट्याचे सेवन करू नये.अंकुरित बटाटाच्या वापरही आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. बटाट्याचे हिरवे अंकुर आणि पानांमध्ये ग्लायकोअल्कोलाइड्स नावाचे रसायन आढळून येते, याच्या सेवनाने डायरिया, पोटदुखी आणि डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. हे रसायन जास्त दिवस प्रकाशात ठेवल्याला बटाट्यामध्येही आढळून येते.
शिंपल्या (मासे)
शिंपल्यांचे सेवन केल्यानं अॅनाफिलेक्सिस अॅलर्जी होण्याची शक्यता असते. यामुळे गळ्यामध्ये सूज येणे, चक्कर येणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात.
फळांमधील बिया
सफरचंद ,चेरी ही फळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. मात्र सफरचंदाचे बी आरोग्यासाठी हानिकारक असतात. चुकून सफरचंदाच्या बीचे सेवन करू नये. कारण यामध्ये सायनाईड असते. यामुळे उलट्यांचा त्रास, चक्कर येणे आणि ब्लड प्रेशरच्या समस्या निर्माण होतात. यामुळे फळांमधील बिया असलेला भाग खाण्यापासून दूर राहावे
हिरवे टोमॅटो
टोमॅटोच्या फांद्या, पानांमध्ये अल्कली नावाचा विषारी घटक असतो आणि हा घटक हिरव्या टोमॅटोंमध्येही असतो. यामुळे हिरवे टोमॅटो खाण्यापासून दूर राहावे किंवा आगीवर भाजून खावेत.
कच्चे काजू
बाजारातून आपण खरेदी करतो ते काजू हे कच्च्या काजूपासून भाजून किंवा वाफेवर तयार केलेले असतात. कच्चे काजू अशा प्रकारे भाजल्याने त्यात असलेल्या उर्शिऑल नावाच्या रासायनिक पदार्थाचा नाश होतो. या उर्शिऑलमध्ये विषारी तत्वे असतात. त्यामुळे कच्चे काजू खाणाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. प्रामुख्याने यामुळे अॅलर्जी होण्याचे प्रमाण अधिक असते.
visit : http://npnews24.com