भोगीच्या भाजी आणि भाकरीचे महत्व

पुणे : एन पी न्यूज 24 – थंडीच्या दिवसात तीळ आणि उष्ण पदार्थ खाल्ले जातात आपले सण देखील तसेच आहेत ज्या- त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या आपल्या खाल्या जाव्यात म्हणून त्यांचा समावेश सणांमध्ये देखील करण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या धामधुमीपाठोपाठ येणारा मकरसंक्रात हा येणारा पहिला सण ! या दिवसात भाजीपाला, धनधान्य तसेच फळाचे मुबलक उत्पन्न होते. निसर्गात ज्याप्रमाणे धनधान्य उपलब्ध असते तसेच शरीरही हा काळात अधिकाधिक अन्न ग्रहण करण्यासाठी तयार असते. नैसर्गिकरित्या या भूक वाढते, पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्न शरीरालाही लागते. महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी पाच भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी केली जाते.
भोगीची भाजी
भोगीची भाजी ही वांग, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाणे घालून केली जाते. वांग हे वातूड असल्याने त्याचा वापर टाळावा असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. पण आयुर्वेदानुसार हिवाळ्याच्या दिवसात वांग्याचे भरीत खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारी आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यास तसेच कफ कमी करण्यास मदत होते. तीळ आणि शेंगदाणे स्निग्ध असल्याने शरीरातील, त्वचेतील रुक्षपणा कमी करण्यास मदत करतात.
यासोबत दुध, तुप, दही , लोणी, ताक यासारख्या पदार्थांचे मोठया प्रमाणात सेवन करावे. हिवाळयामध्ये शरीराला उब मिळावी व थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून या पदार्थांचाही आहारात समावेश करावा.
भोगीच्या भाजी सोबत बाजरीची भाकरी का ?
बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळयात खाणे अधिक हितकारी आहे. बाजरीपासुन दिवे, उंडे, खिचडी, चकोल्या बनविल्या जातात. ज्या बलवर्धक असतात. बाजरी ही बलकारक, उष्ण , अग्निदीपक, कफनाशक असते. त्यामुळे भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी बनवावी. त्यापीठात देखील तीळ मिसळावेत. भाकरीच्या सेवनातून शरीराला मिळणार्या कॅलरीज नक्की पहा.
visit : http://npnews24.com