हिवाळ्यात करा या मसाल्यांचे सेवन , होतील फायदे

0

पुणे : एन पी न्यूज 24 – हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी होतं. थंडी लागू नये म्हणून तुम्ही स्वेटर, शाल, हातमोजे-पायमोजे, कानटोपी वापरता. मात्र शरीराच्या आतील तापमानही नियंत्रित राखणं खूप गरजेचं असतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक असतं, नाहीतर सर्दी-ताप असे आजार बळावू शकतात. यासाठी महत्त्वाचा आहे तो आहार. आहारात काही मसाल्यांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

दालचिनी

हिवाळ्यात दालचिनीचं सेवन अवश्य करावं. दालचिनी थंडीपासून शरीराचं संरक्षण करते. इतकंच नव्हे, तर तापमान कमी झाल्यानं सांधेदुखीची समस्या जास्त होते आणि सांध्यांमधील वेदना कमी करण्यास दालचिनी मदत करते.

हळद
हळदीत अँटि-इन्फ्लेमेटरी घटक असतात. तसंच हळदीमुळे शरीराचं तापमानही वाढतं आणि तुमची रोगप्रतिकारक शक्तीदेखील सुधारते. जेवणात हळदीचा समावेश आवर्जून करावा. दुधासोबत हळद घेणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते.

आले
आले आपलं शरीर उबदार ठेवतं. जेवणानंतर मळमळ किंवा अपचनाची समस्या असले, तर आलं टाकून चहा प्यायल्यास फायदा होतो.

पुदीना

पचनसंबंधी समस्यांवर पुदीनाही फायदेशीर आहे. जर थंडीत जास्त खाणं होत असेल, तर पुदीना घातलेला चहा प्या. पुदीन्यात भूक शमवणारे घटक असतात.

बडिशेप

हिवाळ्यात पचनप्रणालीत बिघाडाची समस्या जास्त होते आणि ती कमी करण्यासाठी बडिशेप उपयुक्त ठरते. अपचन, पोटात गॅस, ओटीपोटातील वेदना, मळमळ या सर्व समस्या बडिशेपमुळे दूर होतात.

जायफळ

जायफळीत अँटिव्हायरल घटक असतात, त्यामुळे आजार बळावत नाहीत. तसंच पोटातील वात आणि डायरियाच्या समस्येवरही जायफळ गुणकारी आहे.

वेलची

आल्याप्रमाणेच वेलचीतही अँटि-इन्फ्लेमेटरी घटक असतात. नाक बंद झाल्यास वेलचीचं सेवन करावं. त्यामुळे नाकातील मार्ग मोकळा होऊन योग्यप्रकारे श्वास घेता येतो.

काळी मिरी

काळी मिरी शरीराचं तापमान वाढवते, त्यामुळे तुम्हाला थंडीपासून दूर ठेवते. त्यामुळे एखाद्या खाद्यपदार्थावर काळी मिरीची पूड टाकावी किंवा चहामध्येही काळी मिरी टाकून तसा चहा पिऊ शकता.

लवंग
हिवाळ्यातील आहारात लवंगचं सेवन जरूर करावं, कारण शरीराचं तापमान वाढवण्याची क्षमता लवंगमध्ये आहे. तसंच दातदुखीवरही लवंग फायदेशीर आहे. मधासोबत लवंगाचे चाटण देखील घसा आणि सर्दीच्या रोगांवर फायदेशीर ठरते.

लसूण

लसणीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच लसणीमुळे रक्तही पातळ राहण्यास मदत होते, त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.