इंटरनेटचं लागलं खुळ… त्याने चक्क शिक्षण देखील सोडलं

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – हल्लीच्या तरुण पिढीला नव्हेच तर अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच इंटरनेट त्यातही सोशल नेट्वर्किंग साईट्स ने अक्षरश: वेड लावले आहे. आता मुंबईत राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला इंटरनेट च्या व्यसनाने इतके पछाडले की त्यानं तब्बल वर्षभर शाळेचं तोंड देखील पाहिलं नाही. एवढाच नाही तर दिवसातले १६ -१६ तास इंटरनेट वर तो घालावत होता त्यामुळे त्याला थेट उपचार घ्यावे लागत आहेत.

पनवेल येथे राहणारा हा युवक इंजिनीअरींगच्या पहिल्या वर्षाला शिकतो. इंटरनेट आणि सोशल मिडीयाचं त्याला इतकं व्यसन लागलं की त्याने अभ्यास करणं आणि कॉलेजला जाणंही सोडून दिलं. तब्बल वर्षभर विवेकने कॉलेजचं तोंडही पाहिलं नाही. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या मुलाला ‘इंटरनेट अॅडिक्शन’ झालं होतं. पहिल्यांदा मोबाईल आणि लॅपटॉपवर सुरूवातीला दोन-तीन तास तो खर्च करायचा. त्याचं व्यसन इतकं वाढलं की दिवसातले १६ तास तो इंटरनेटवर घालवायचा. फक्त जेवणासाठी आणि झोपण्यासाठी तो खोलीतून बाहेर यायचा. अभ्यास न केल्यामुळे तो नापासही झाला. मुलाच्या वागणूकीत झालेला बदल हा पाहून पालकांनी घरातील इंटरनेट कनेक्शन काढून टाकलं. आणि यानंतर विवेकची चिडचिड होऊ लागली तसंच आई वडिलांशी देखील त्यांची भांडणं होऊ लागली. त्यानंतर त्याला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राहुल भातांब्रे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राहुल भातांब्रे यांच्याकडे या मुलावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यावर औषधोपचार व बिहेव्हिअर थेरपीद्वारे उपचार केले जात आहेत. त्यानुसार आता मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून इंटरनेट वापरचं प्रमाण कमी झालायं.

इंटरनेट वापरणे एक व्यसन

या मुलावर उपचार करणारे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राहुल भातांब्रे म्हणाले, ‘‘इंटरनेट वापर हे एक व्यसन असून तरुणाई याकडे आकर्षित होतेय. या मुलाने सुद्धा इंटरनेटच्या आहारी जाऊन कॉलेज सोडलं. दिवसातून 16-16 तास हा मुलगा सोशल मिडीयावर असायचा. यामुळे तो कधीच कॉलेजला गेला नाही. केवळ परीक्षेसाठी कॉलेजला जायचा. पण अभ्यास झाला नसल्याने तो नापास झाला. त्याच्या वागणूकीत झालेला बदल समजताच पालकांनी त्याला माझ्याकडे आणलं. तेव्हा त्याला इंटरनेटचं व्यसन असल्याचं लक्षात आलं.’’

डॉ. भातांब्रे पुढे म्हणाले, ‘‘इंटरनेटच्या अतिवापरामुळे या मुलाची मानसिक स्थिती बिघडली होती. कुठेच मन रमत नव्हतं आणि कॉलेजला जाण्याची इच्छा होत नव्हती. फक्त घरातील एका खोलीत तो बसून राहायचा. पण क्लिनिकमध्ये उपचारासाठी आल्यानंतर त्याला तातडीनं औषधोपचार सुरू करण्यात आलेत. याशिवाय बिहेव्हिअर थेरपी सुरू करण्यात आली असून त्यात बदल दिसून येतोय. दर दिवशी हा मुलगा १६ तास इंटरनेटवर राहणारा हा मुलगा आता फक्त दहा तास इंटरनेट वापरतोय.’’

काय आहेत इंटरनेट ऍडिक्शन ची लक्षणे

‘‘इंटरनेटचा अतिवापर, सतत कम्प्युटरवर राहणं किंवा गेम्स खेळत बसणं ही सगळी इंटरनेट अॅडिक्शन डिसऑर्डरची लक्षणं आहेत. मानसिक, शारीरिक आजारांसह तरुणांच्या शिक्षण आणि करिअरवरही त्याचे दुष्परिणाम होतायत.’’ असंही डॉ. भातांब्रे यांनी म्हटलंय.

याबाबत बोलताना, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नुतन लोहिया यांनी सांगितलं की, ‘‘इंटरनेटचा वापर वाढल्याने तरुणपिढी आकर्षित होत आहे. यामुळे वास्तवाचं भान मुलांना राहिलेलं नाही. सोशल मिडीयावर जे दाखवलं जातं ते खरं मानून ही मुलं आयुष्य जगतात. त्यामुळे अनेकदा व्यसनाच्या आहारी जाण्याचीही शक्यता असते. अशा स्थितीत कुटुंबियांनी आधार देणं गरजेचं असतं. तर या मुलांना या व्यसनातून दूर नेता येऊ शकतं.’’

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.