तीळगुळ खा आणि आरोग्यदायी फायदे मिळवा

0

पुणे : एन पी न्यूज 24 – तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण मानले जातात आणि हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उष्णता मिळण्यासाठी ते पूर्वापार आपल्या आहारात असावेत, असे सांगितले आहे. मकरसंक्रातीला तीळ व गुळ वाटुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. भारतीय सण उत्सव परंपरा यांना आरोग्याची उत्त्तम जॊड आहे. आपल्या सणातील आहार हा हवामानानुसार आरोग्यास उपयुक्त ठरणारा असतो. त्यामागे शास्त्रीय कारणे देखील असतात.

तीळगुळाचे फायदे

थंडीच्या दिवसांत तीळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. तीळामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स, मॅग्नेशिअम, आयर्न आणि कॉपरसह अनेक खनिजे असतात. तीळ खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. यातील लिपोफोलिक अँटीआॅक्सिडंट आपल्या मेंदूवर वाढत्या वयाचा परिणाम होऊ देत नाही. वृद्धापकाळात स्मरणशक्ती कमी होत जाते. त्यामुळे तिळाचे रोज सेवन केल्यास मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

तीळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअमसारख्या तत्त्वामुळे हाडे मजबूत होतात. दिवसात एक चमचा तीळ खाल्ल्यास दात मजबूत होतात. तिळात फायबर आणि अ‍ॅँटीआॅक्सिडंट असल्याने प्रतिकारक्षमता वाढते, तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढत नाही.

तीळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल काबूत ठेवायला मदत होते. तीळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्ल जास्त प्रमाणात असते.याच्या तेलातिल आम्ले रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू देत नाहीत.

तीळगुळाच्या लाडूंमध्ये वापरला जाणारा गूळही औषधी असतो. हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे, हिवाळ्यात शरीरात उर्जा,उष्मा वाढविण्यास याचा उपयोग केल्या जातो. गूळ हा शरीराला हलकेपणा आणतो, पचायला हलका, पथ्यकर, पित्तवातनाशक आणि रक्त शुद्ध करणारा आहे. गूळ हा मधुर चवीचा असल्याने शरीराचे बल वाढवितो.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.