आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘विद्यार्थ्यांना’ मिळणार ‘यश’, ‘या’ राशीच्या व्यक्तींनी मात्र काम करताना ‘सावध’ रहा

0

एन पी न्यूज २४
मेष रास –

कुटूंबातील व्यक्तींची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समस्या वाढतील आणि आर्थिक नुकसान देखील होईल. भागीदारीत केलेले काम आज फायदेशीर ठरेल. नोकरीत बदल करावा लागेल.

वृषभ रास –
इलेक्ट्रॉनिक्सच्या उद्योगात फायदा होईल. जमिनी संबंधित वाद मिटतील. व्यसन करणाऱ्या लोकांपासून दूर रहा.

कन्या रास –
विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. प्रत्येक ठिकाणी उत्साह दाखवणे चांगले नाही. चूकीच्या मित्रांमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे.

सिंह रास –
स्त्रियांनी स्वभावात चिडचिडेपणा आणू नका. त्यामुळे कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. सन्मान मिळण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.

मिथुन रास –
दूर प्रवासाचा योग आहे. व्यवसायात कोणतेही काम घाईगडबडीत करु नका. पैसे परत मिळणार नाहीत. सावध राहून काम करा.

कर्क रास –
वेळ योग आहे, अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. धनलाभासाठी अधिक प्रयत्न करावा लागेल.

तुळ रास –
जेवढे चांगले विचार तेवढे चांगले व्यवहार पार पडतील. मित्राच्या आजारपणात मदत करालं. शेजाऱ्यांशी वाद विवाद होऊ शकतो.

धनु रास –
कर्मचाऱ्यांच्या व्यवहारामुळे तुम्ही दुखी व्हालं. धार्मिक कार्यात मदत करालं. वेळ योग्य नाही, त्यामुळे नवे काम करणार असाल तर नुकसान होण्याची शक्यता आहे.

मकर रास –
राजकीय क्षेत्रात मनाचा कारभार झाल्याने प्रसन्नता वाढेल. अनेक दिवसांपासून अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
समाजात तुमचा सन्मान वाढेल. वेळ अनुकूल आहे. मित्राचे सहकार्य न लाभल्याने वाईट वाटेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल.

वृश्चिक रास –
तुमच्या चूकीच्या वर्तनामुळे घरात तणाव असेल. नोकरी करत असाल तर सोडण्याची इच्छा होईल.

मीन रास –
पिवळे वस्त्र धारण केल्याने तुमचे काम बिघडू शकते. पती पत्नी छोट्या कारणांवरुन वाद होण्याची शक्यता आहे. कुटूंबाची जबाबदारी घ्यावी लागेल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

 

Leave A Reply

Your email address will not be published.