PMC बँकेवर RBI चे निर्बंध, 6 महिन्यात फक्‍त 1000 रूपये काढता येणार

24th September 2019

मुंबई : एनपीन्यूज24 – तुम्ही जर मुंबईतील पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण या बॅकेच्या व्यवहारांवर बंधने लावण्यात आली आहे. मंगळवारी भारतीय रिझर्व बँकने मुंबईतील पंजाब अॅण्ड को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेडच्या सर्व प्रकारच्या व्यापारिक व्यवहारांवर बंधने लावली. ज्यामुळे बँकेच्या गुंतवणूकदारांना आणि शहरातील व्यवसायिक वर्गाला मोठा फटका बसला आहे.

या बँक शाखेचे मुख्य महाप्रबंधक योगेश द्याल यांनी सांगितले की, आरबीआय निर्देशांनुसार, खातेधारक आपल्या बचत, करंट आणि इतर खात्यातून 1,000 रुपयांपेक्षा जास्त रुपये काढू शकणार नाहीत. आरबीआयने आणलेल्या निर्बंधानंतर व्यवहार कठोर केले आहेत. त्यामुळे खातेदारांना आता बँकेतून आवश्यक तेवढे पैसे काढता येणार नाहीत. बँकेचे व्यवहार देखील कठोर करण्यात आले आहेत.

पीएमसी बँकेवर आरबीआयच्या अग्रिम मंजुरी नंतर कर्जाशिवाय आणि रक्कम यावर रिन्यू करणे, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, डिपॉजिट स्विकारणे यावर रोख लावण्यात आली आहे.