जोखीम असलेल्या गर्भधारणेची खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये यशस्वी हाताळणी
· जुळ्यातील एक गर्भ काढून टाकल्यानंतरही स्त्रीला गरोदरपण पुढे नेणे शक्य झाले
· गर्भाशयातील जुळ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला; मृत गर्भ काढून टाकला पण दुसरा गर्भ सुरक्षित ठेवून गर्भावस्था पुढे चालू ठेवण्यात आली
नवी मुंबई : एन पी न्यूज 24 – खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये एका स्त्रीच्या जोखमीच्या गर्भावस्थेचे यशस्वीरित्या व्यवस्थापन करण्यात आले. यात डॉक्टरांनी जुळ्यांपैकी मृत झालेला गर्भ गर्भाशयातून काढून टाकला आणि दुसरा गर्भ वाचवण्यासाठी आवश्यक ते व्यवस्थापन केले. जुळ्यातील एक प्रसूतीद्वारे किंवा गर्भपाताने बाहेर आल्यास गर्भारपण पुढे चालू राहण्याची शक्यता खूप कमी असते. असिंक्रोनस बाळंतपणाचा दर १००० जन्मांमागे ०.१४ एवढा कमी आहे. जुळ्यांच्या प्रसूतीमधील जगात नोंदवले गेलेल सर्वाधिक अंतर १११ दिवस इतके आहे.
३६ वर्षीय सौ. प्रीती अय्यर यांच्याबाबत गर्भधारणेसाठी केलेले तीन प्रयत्न अपयशी ठरले होते. त्यानंतर त्यांना नैसर्गिकपणे गर्भधारणा झाली. त्यांना डायकोरिऑनिक (फ्रॅटर्नल) जुळी गर्भधारणा झाली. गर्भधारणेनंतर १३ आठवडे व ५ दिवसांनी त्यांचे गर्भाशयमुख आतून उघडू लागले. त्यामुळे गर्भाशयमुख बंद ठेवण्यासाठी टाका घालण्यात आला. त्यांना औषधे देण्यात आली व विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. दोन आठवड्यानंतर हा टाका सैल झाला व पुन्हा घालावा लागला. रुग्णाच्या गर्भाशयमुखाची लांबी व टाका कितपत टिकून आहे यावर काटेकोर लक्ष ठेवण्यात आले.
काही दिवसांनी, गर्भधारणेला १५ आठवडे झालेले असताना त्या ओटीपोटात दुखत असल्याची तसेच योनीमार्गातून रक्तस्राव होत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आल्या. गर्भ वाचवण्यासाठीचे व्यवस्थापन सुरू करण्यात आले. मात्र, त्यांच्या गर्भाशयाच्या एका बाजूने पाणी जाऊ लागले. त्यांना तीव्र वेदना सुरू झाल्या व त्यामुळे गर्भाशयाला घातलेला टाका उसवून १ गर्भ बाहेर आला.
म्हणून जुळ्यांची वाढ तसेच गर्भजलाचे प्रमाण तपासण्यासाठी अल्ट्रा-सोनोग्राफी (यूएसजी) करण्यात आली. गर्भांपैकी एक (पहिले जुळे, खालील गर्भ) हालचाल करत नसून त्याच्या हृदयाचे ठोकेही बंद पडले आहेत हे यूएसजीमध्ये दिसून आले आणि एक गर्भ मृत झाल्याची खात्री पटली. ते गर्भाशयाबाहेर आले होते. दुसरे जुळे मात्र सामान्य होते व त्याची प्रकृती सामान्य होती.
ही बाब संपूर्ण कुटुंबासाठी दु:खद तसेच हादरवून टाकणारी होती.
मदरहूड हॉस्पिटलमधील कन्सल्टण्ट प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनू विज म्हणाल्या, “मृत गर्भ काढून टाकावा आणि पुढील २४ तास गर्भाशयात काय हालचाली होतात यावर लक्ष ठेवावे असा निर्णय कुटुंबियांशी चर्चेनंतर करण्यात आला. एक गर्भ काढल्यानंतही गर्भाशय निरोगी आहे आणि दुसरे जुळे गर्भाशयात उत्तम स्थितीत आहे असे यूएसजीमध्ये दिसून आले. मग आम्ही पुन्हा एकदा गर्भाशयमुखाला टाका घालण्याचा निर्णय केला. गरोदर स्त्रीने २५ आठवडे आणि ६ दिवसांपर्यंत गर्भ पोटात वाढवला. त्यानंतर मुदत पूर्ण होण्यापूर्वी तिने ८४० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. या बाळाला लगेच एनआयसीयूमध्ये हलवण्यात आले.”
डॉ. विज पुढे म्हणाल्या, “जुळ्यांची गर्भधारणा जोखमीची असते आणि प्लॅसेंटाची स्थिती, आईचे वय, वैद्यकीय समस्या व प्रसूतीविषयक गुंतागुंतींमुळे ते अधिक कठीण होते. त्यामुळे जुळ्यांची वाढ हा चिंतेचा विषय असतो. जुळ्यांपैकी एकाचा गर्भाशयातच मृत्यू झाल्यास, दुसऱ्या जुळ्याच्या आयुष्यालाही धोका निर्माण होतो. वाचलेल्या जुळ्याला सेरेब्रल पाल्सी होण्याचा किंवा मेंदूचा अन्य विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आईच्या पोटातील बाळाची आम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते.
मदरहूड हॉस्पिटलमधील कन्सल्टण्ट बालरोगतज्ज्ञ व नवजात अर्भक तज्ज्ञ डॉ. सुरेश बिराजदार म्हणाले, “या बाळाला लवकर म्हणजेच त्याच्या जन्मापासून तीन दिवसांच्या आत स्तनपान सुरू करणे तसेच त्याला केवळ आईचेच दूध देणे त्याचे वजन वाढण्यासाठी तसेच रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी उपयुक्त ठरले. अर्भकाला केवळ मातेचे दूध देणे आणि हाताच्या स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांनी पाळलेला काटेकोरपणा यांमुळे या छोट्याशा बाळाला प्राणघातक प्रादुर्भावांपासून दूर ठेवण्यात मदत झाली. सध्या या बाळाचे वजन १.७ किलो झाले आहे.”
“रुग्णालयात असताना आईला कांगारू केअरचे प्रशिक्षण देण्यात आले होते. बाळ स्थिर झाल्यानंतर पहिले थोडे दिवस त्याची काळजी घेण्याची ही पद्धत आहे. यामध्ये बाळाला आईच्या छातीवर ठेवून दोघांच्या त्वचेचा एकमेकांना स्पर्श करून दिला जातो,” असे डॉ. विज म्हणतात.
सौ. प्रीती अय्यर म्हणतात, “मला व माझ्या बाळाला नवीन आयुष्य दिल्याबद्दल आम्ही रुग्णालयाचे व डॉक्टरांचे आभार मानतो. माझ्या बाळाला त्यांनी वाचवले. त्यानंतर त्याला बरे केले. आता ते निरोगी आहे. हे या सर्वांनी निष्ठेने केलेल्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. मला आई झाल्याचा अभिमान वाटत आहे आणि माझे बाळ मृत्यूच्या दाढेतून वाचले याचा आनंद होत आहे. आता मी जशा आयुष्याचे स्वप्न बघितले होते, तसे आयुष्य आम्ही जगू शकू.”
मदरहूड हॉस्पिटलबद्दल
मदरहूड हॉस्पिटल हे आघाडीचे महिला व मुलांचे हॉस्पिटल असून ते महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. प्रसूती, स्त्रीरोग, प्रजनन, निओनॅटोलॉजी, बालरोग, फेटल मेडिसीन आणि रेडियोलॉजी अशा सर्व विभागातील आरोग्यसेवा मिळत असल्याने प्रत्येक महिला व बाळाच्या उपचारांसाठी या हॉस्पिटलला प्राधान्य देण्यात येते. नवजात बालके आणि मुलांना या ठिकाणी उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्यात येते. यात २४ तास उपल्ध असलेली पिडअॅट्रिक इमर्जन्सी सेवा, तसेच स्तनांचे आरोग्य, उच्च जोखीम असलेले गरोदरपण, लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि जनरल गायनेकोलॉजी अशा आरोग्यसेवा महिलांना प्रदान करण्यात येतात.
visit : http://npnews24.com