पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये मेटॅबॉलिक सिण्ड्रोम ३३% अधिक आढळून येतो
येथील माधुरी बुरांडे लाहा सल्लागार, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ मदरहूड हॉस्पिटल पुणे, खराडी
- पीसीओएस असलेल्या ३०% महिलांमध्ये इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स (आयजीटी) आढळून येतो आणि त्या व्यतिरिक्त ७.५% महिलांना मधुमेह होण्याची शक्यता असते. पीसीओएसमुळे मधुमेह आणि एण्डोमेट्रिअल कर्करोग होण्याची शक्यता असते.
- त्याचप्रमाणे पीसीओएस असलेल्या आणि स्थूल नसलेल्या १०.३% महिलांना आयजीटी असतो आणि १.५% महिलांना मधुमेह असतो. दीर्घकालीन विचार करता २०-३० वर्षांपूर्वी पीसीओएसवर उपचार केलेल्या १६% महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत मधुमेह विकसित झाल्याचे दिसून आले आहे.
पुणे : एन पी न्यूज 24 – पॉलिसायस्टिक ओव्हरी सिण्ड्रोम (पीसीओडी) असलेल्या अनेक रुग्णांमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स (इन्सुलिन स्त्रावाला होणारा अडथळा), स्थूलपणा, डायस्लिपिडेमियासारखे मेटॅबॉलिक सिण्ड्रोमची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे विकार होण्याचा धोका वाढतो. शरीराच्या मध्यभागी असलेला स्थूलपणा, हायपरटेन्शन, अॅथरोजेनिक डायस्लिपिडेमिया आणि इन्सुलिन रेसिस्टन्स हे घटक मेटॅबॉलिक सिण्ड्रोमसाठी कारणीभूत असतात. पॉलिसायटिक ओव्हरी सिण्ड्रोम (पीसीओएस) असलेल्या ३३% महिलांवर मेटॅबॉलिक सिण्ड्रोमचा परिणाम होतो. पीसीओएस होण्यासाठीचे कारण अजूनही अज्ञात आहे. लवकर निदान झाले आणि वजन कमी केले तर टाईप २ मधुमेह आणि हृदयविकारासारखे दीर्घकालीन गुंतागुंतीचे आजार टाळता येऊ शकतात.
पॉलिसायटिक ओव्हरी सिण्ड्रोम (पीसीओएस) हा संप्रेरकांशी संबंधित आजार असून प्रजजनक्षम वयातील महिलांमध्ये हा आजार आढळून येतो आणि १०-१८% महिलांना या आजाराची लागण होते. पीसीओएस असलेल्या महिलांना अनियमित किंवा वाढीव मासिक पाळी असते किंवा त्याच्यात पुरुषी संप्रेरकांची (अँड्रोजेन) पातळी अधिक असते. स्त्रीबीज ग्रंथींमध्ये (ओव्हरीज) मोठ्या प्रमाणावर स्त्रीबीजे (फॉलिकल्स) जमा होतात आणि त्यातून नियमितपणे नियमितपणे बीजांडे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे पीसीओएस असलेल्या महिलांनी काळजी घेणे आणि या घातक आजारापासून लांब राहणे आवश्यक आहे.
पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमधील सल्लागार, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ माधुरी बुरांडे लाहा म्हणाल्या, “अनियमितपणे आहार घेतल्याने इन्सुलिन स्त्रवण्याच्या प्रमाणात वाढ होते आणि इन्सुलिनला होणारा अडथळाही वाढतो. त्यामुळे मधुमेह आणि पीसीओएसवर उपचार करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करून वजन कमी करणे हाच सर्वात सुरक्षित आणि स्वस्त उपाय आहे. पीसीओएस असलेल्या स्थूल महिलांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) असलेली कर्बोदके समाविष्ट केल्यास इंन्सुलिनप्रति असलेल्या संवेदनशीलमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. त्याचप्रमाणे इन्सुलिन रेसिस्टन्सससाठी वैद्यकीय उपचारपद्धती उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ग्लुकोजवर नियंत्रण मिळविण्यात सुधारणा होतेच, त्यायबरोबर पीसीओएसशी संबंधित प्रजनन यंत्रणेच्या आजारांमध्ये सुधारणा दिसून येते. मेटफॉर्मिनमुळे वजन कमी न होता ओव्ह्युलेशनचा वेग वाढतो. त्यामुळे उत्स्फूर्त गर्भावस्थेच्या (कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा करून झालेल्या प्रसूतीनंतर नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होणे) दरातही वाढ झाली आहे.
मधुमेह असलेले रुग्ण आणि बीएमआय>३५ कि/मी२ असलेल्या रुग्णांसाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया हा योग्य उपचार असू शकतो. बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर वजन कमी झाल्यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स, हायपरटेन्शन आणि डायस्लिपिडेमियामध्येही सुधारणा दिसून येते.
‘त्याचप्रमाणे ९० मिनिटांची मध्यम स्वरुपाची एरोबिक अॅक्टिव्हिटी समाविष्ट असलेला एकूण १५० मिनिटे व्यायाम केल्याने शरीराचे वजन ७% कमी होते आणि मधुमेह विकासित होण्यात ५८% घट होते. कमी झालेल्या वजनामुळे पचनक्रियेमध्ये सक्रिय असलेल्या व्हिसेरल चरबीमध्ये घट होते. परिणामी, इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होतो आणि लिपिड प्रोफाईल सुयोग्य होते आणि चिंताग्रस्तता आणि नैराश्याचे प्रमाणही कमी होते.’, अशी पुष्टी डॉ. माधुरी यांनी जोडली.
पीसीओएस असलेल्या महिलांनी मेटॅबॉलिक सिण्ड्रोमसाठी करून घ्यायच्या चाचण्या
- वजन, बीएमआय, कंबरेचा घेर दर वेळी मोजून घ्यावा
- बीएमआय<२५ असलेल्या महिलांनी वर्षातून एकदा रक्तदाब तपासून घ्यावा आणि बीएमआय>२५ असलेल्या महिलांनी दर वेळी रक्तदाब तपासून घ्यावा
- सामान्य प्रकृती असलेल्या महिलांनी दर २ वर्षांनी लिपीड प्रोफाईल करून घ्यावी.
- ज्यांची प्रकृती असाधारण आहे किंवा वजन जास्त आहे त्यांनी वर्षातून एकदा लिपिड प्रोफाईल करून घ्यावी.
- प्रत्येक महिलेने दर २ वर्षांनी ७५ ग्रॅम ओजीटीटी करून घ्यावी आणि ज्यांच्यात जोखीम घटक अधिक आहे त्यांनी दर वर्षी ही चाचणी करून घ्यावी.
visit : http://npnews24.com