शिक्षकांची आदर्श पाठ कार्यशाळा 

0
 पुणे : एन पी न्यूज 24 –  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुणे व पिंपरी येथील संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांसाठी ‘ आदर्श पाठ कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, विदयापरीक्षण  करणाऱ्या  निवृत्त मुख्याध्यापिका सुजाता नायडू व कामिनी झवेरी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी डॉक्टर शरद कुंटे यांनी शिक्षकांशी सुसंवाद साधताना ते म्हणाले.”ज्या प्रमाणे बावनकशी सोन्यावर धूळ  बसता कामा नये, त्याची झळाळी कायम रहावी तसेच ,शिक्षकांचे ज्ञान कायम अद्यावत असावे ,एकमेकांकडून कौशल्यांची देवाणघेवाण व्हावी , विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन अवघड विषय सोपा करून सांगता येण्याची हातोटी शिक्षकांत असावी, शिक्षकाचे काम आणि छंद एकच असावा, शिक्षक ज्ञानाने, कौशल्याने अधिक समृद्ध व्हावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सांगितले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्या डॉ.स्वाती जोगळेकर यांचे या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन लाभले आहे. तिलोत्तमा रेड्डी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कल्पना वाघ यांनी आभार मानले. दिनांक ९सप्टेंबर ते १२ सप्टेंबर व नोव्हेंबरमध्ये  तीन दिवस अशी एकूण सहा दिवस ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ व रमणबाग प्रशालेच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.