केवळ भावाच्या ‘स्वप्नपुर्ती’साठी ‘त्यानं’ ISRO ची नोकरी सोडली, ‘या’ खडतर गोष्टींचा सामना करत ‘तो’ बनला IAS

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मनुष्य कितीही मोठे आव्हान पेलवू शकतो याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे रायबरेली मधील आशुतोष द्विवेदी. आशुतोषने लहानपणापासूनच आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले होते. प्रत्यक्षात जेव्हा ते आठवीत होते तेव्हा त्यांच्या भावाने सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा दिली होती.ते पशुवैद्यकीय अधिकारी बनले होते. त्यांनी प्रीलिअम्स, मेन्समध्ये पात्रता मिळविली होती, परंतु अंतिम यादीमध्ये त्यांचे नाव नव्हते. तो आयएएस होऊ शकला नाही. आशुतोष यांनी आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि त्यांनी याच उद्देशाने पुढील अभ्यास सुरू केला.

HBTI मध्ये निवड
आशुतोष म्हणतात, प्रतापगढच्या लालगंज आघारा येथील शीतलाऊ मोंटेसरी स्कूलमधून, हायस्कूलनंतर मी कानपूरच्या दीन दयाल उपाध्याय इंटर कॉलेजमधून  पास झालो.दरम्यान कानपूर एचबीटीआयमध्ये निवड झाली.

अनेक नोकऱ्या सोडल्या
आशुतोषने यांनी सांगितले की एचबीटीआयमध्ये कॅम्पस सिलेक्शन दरम्यान त्यांना मारुती उद्योगात नोकरी मिळाली. यानंतर, ते इस्रोमध्ये एक वैज्ञानिक बनले परंतु त्यांनी तेथे केवळ 15 दिवस काम केले.

वयोवृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा
आशुतोषने सांगितले, एक दिवस मी आग्र्याच्या एका गावात कामानिमित्त बैठक घेत होतो.त्या वेळेस ताक पिण्याच्या बहाण्याने एका म्हातारीने त्यांना आपल्या घरी नेले आणि तिची व्यथा सांगितली. म्हातारीला आपल्या मुलीचे लग्न करायचे होते आणि तिच्या जमिनीतून गेल पाईपलाईन जात होती त्यामुळे तिला मोबदला थोडा वाढून हवा होता.

मात्र आशुतोष यांनी त्या महिलेला मी हे करण्यासाठी असमर्थ असल्याचे सांगितले त्यावर त्या महिलेने त्यांना सुचवले की तुम्ही कलेक्टरशी बोला. त्याच वेळी आशुतोष यांच्या डोक्यात युपीएससीचा विचार सुरु झाला आणि याच घटनेतून मला युपीएससी ची प्रेरणा मिळाली असल्याचे आशुतोष  यांनी सांगितले.

त्यानंतर आशुतोष यांनी अभ्यासाला सुरुवात केली आणि मोठ्या जिद्दीने आपले यश संपादन केले. 2017 मध्ये आशुतोष यांनी यूपीएससीची परीक्षा पास होत  70 वा क्रमांक पटकावला.

Leave A Reply

Your email address will not be published.