देशात अखंडता आणि एकात्मतेची भावना दृढ झाली

0
डॉ. हर्ष वर्धन
पुणे : एन पी न्यूज 24 – घटनेतील कलम 370 हटविल्यानंतर देशात आनंदाचे वातावरण असून, देशाच्या अखंडता व एकात्मतेची भारतीयांमध्ये सकारात्मक भावना दृढ झाली असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय एकता अभियानाअंतर्गत ‘एक राष्ट्र, एक संविधान’ या विषयावर डॉ. हर्ष वर्धन शहरातील डॉक्टरांच्या जनजागरण सभेत बोलत होते.
खासदार गिरीश बापट, भाजपच्या शहाराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रीय एकता अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. हर्ष वर्धन पुढे म्हणाले, ‘काश्मीरचा प्रश्न सहज सुटेल असा विचार कोणाच्याही मनात येत नव्हता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कायद्याचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला. त्यानंतर काश्मीर मध्ये हिंसाचार झाला नाही. देशवासियांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले.’
खासदार गिरीश बापट यांचे भाषण झाले. आमदार माधुरी मिसाळ यांनी स्वागत, राजेश पांडे यांनी प्रास्ताविक आणि डॉ. सुकुमार सरदेशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
—–
डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारने कायद्याचा मसुदा तयार केला आहे. आवश्यक कार्यवाही करून येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात त्याला मान्यता मिळेल असे आश्वासन दिले.
Leave A Reply

Your email address will not be published.