भोईटे गुरुजी यांना ‘डॉ.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान

जेजुरी : एन पी न्यूज २४- राज्य शासनाच्या वतीने ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील ग्रंथालय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर गुलाबराव भोईटे गुरुजी यांना विभागीय स्तरांवरील डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते बुधवारी मुंबईत देण्यात आला.
सेवानिवृत्त असणारे ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी कोथळे येथे वाचन संस्कृती रुजावी यासाठी १९६४ साली जनसेवा वाचनालय आणि ज्ञानरंजन वाचनालय ग्रंथालयाची प्रशस्त इमारत उभी केली असून सहा हजार विविध पुस्तके ग्रंथालयात आहेत.
त्याप्रसंगी भोईटे यांच्या समवेत सहकारी ह.भ.प. जगन्नाथ वारघडे महाराज, सदाशिव अण्णा चिकणे, किसनभाऊ देवकर, नीरा बाजार समितीचे संचालक ॲड. धनंजय भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी