विकासकामांचा संदेश देणारी महाजनादेश यात्रा

पुणे : एन पी न्यूज 24 – राज्यातील जनतेसाठी भाजप सरकारने केलेली विकासकामे आणि लोककल्याणकारी निर्णयाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाची यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रेचे आयोजन केले असल्याचे मत खासादर गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात आयोजित केलेल्या महाजनादेश यात्रेतील निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना खासदार बापट बोलत होते. भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश अप्पा माळवदकर, संयोजक ओमकार माळवदकर, नगरसेवक गोपाळ चिंतल, महेश लडकत यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाजनादेश यात्रेतील निवडक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. विविध धर्माचे नागरिक, विद्यार्थी, कामगार, दलित, आदिवासी, व्यावसायिक, शेतकरी, शेतमजुरांनी केलेल्या स्वागताच्या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रांचा समावेश आहे. उद्या बुधवार सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.