टीव्हीच्या नावाखाली लाखाला ‘गंडा’

0

पिंपरी : एन पी न्युज २४ ऑनलाइन – एकाने ऑनलाईन टीव्ही मागविला. डिलिव्हरी न मिळाल्याने कस्टमर केअरला फोन केला असता तेथील कर्मचाऱ्याने एक लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी निळकंठ काशीनाथ होना (वय ३३, रा़ सुवर्णालय अपार्टमेंट, थोरवे वस्ती, च होली ) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांनी फ्लिपकार्ट वरुन टीव्ही मागविला होता. बरेच दिवस वाट पाहिल्यानंतरही डिलिव्हरी न झाल्याने त्यांनी कस्टमर केअरला फोन केला. कस्टमर केअरला फोन करून माहिती दिली. तेव्हा फोन घेणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचा एटीएमचा सीव्हीव्ही नंबर विचारुन घेतला.

त्याद्वारे त्याने त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. इतके पैसे गेल्यानंतर त्यांना टीव्ही मिळाला नाही तो नाहीच. शेवटी त्यांनी आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.