‘कलम 371’ला हात लावणार नाही : गृहमंत्री अमित शहा

0

गुवाहाटी :एन पी न्यूज 24 – आसाममध्ये नुकतीच एनआरसीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (रविवार) आसामचा दौरा केला. नॉर्थ ईस्ट काऊन्सिलच्या बैठकीसाठी शाह उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या कलम 371 संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सरकार त्याचा सन्मान करते, असे शहा यांनी स्पष्ट केले.

भारतीय संविधानात ईशान्येकडील राज्यांना देण्यात आलेल्या विशेषधिकारांच्या 371 व्या कलमाला विशेष स्थान देण्यात आले असून भाजपा त्याचा आदर करते. भाजपा सरकार यामध्ये कोणताही बदल करणार नाही. जम्मू-काश्मिरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम 370 मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरुपाच्या होत्या. कलम 370 आणि कलम 371 या दोन्हीमध्ये मोठा फरक असल्याचे शहा यांनी सांगितले. जम्मू काश्मिरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर कलम 371 बाबतही अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. या कलमांतर्गत भारतीयांना त्या ठिकाणी संपत्ती खरेदी करता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

घटनेतील 371 कलमामुळे पूर्वोत्तर राज्यातील आदिवासी जमातींना संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांची संस्कृती जतन होण्यात मदत होते. आधीच आसाममध्ये एनआरसीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर 19 लाख लोकांना या यादीतून वगळ्यात आले. या यादीवर भाजपच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.