दिवसाढवळ्या BJP नेत्याची हत्या, गोळ्या झाडून मारेकरी फरार !

0

नवी दिल्ली :एन पी न्यूज 24 – उत्तर प्रदेशातील हापुड़मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची हत्या झाली आहे. धौलाना पोलिस स्टेशन परिसरातील सपनावत कालव्याजवळ भाजपा नेते राकेश शर्मा यांच्यावर कारमध्ये आलेल्या बदमाश्यांनी गोळीबार केला. या दरम्यान राकेश शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. गुन्हा केल्यावर हे बदमाश फरार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश शर्मा हा धौलाना पोलिस स्टेशन परिसरातील करणपूर जट्ट गावचा रहिवासी होता. आज सकाळी साडेसात वाजता ते जनता इंटर कॉलेजमध्ये जात होते. राकेश शर्मा सपनावत गावाजवळील कालव्याजवळ येताच कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी राकेश शर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि ते तेथून पसार झाले.

गोळीबारानंतर राकेश शर्मा यांना जखमी अवस्थेतील हापुड़ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे राकेश शर्मा यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले, मारेकऱ्यांचा तपास सुरु आहे.

या घटनेबाबत सध्या लोकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. हत्येची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक रुग्णालयात पोहोचले आणि कुटुंबीयांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. विविध मुद्दे लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मारेकऱ्यांना अटक केली जाईल, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.