तुमच्या मुलाच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा आणण्याचे उपाय

0

डॉ. जगदीश काथवटे, सल्लागार, बालरुग्णविभाग आणि निओनॅटोलॉजी,

मदरहूड हॉस्पिटल्स, पुणे

 

एन पी न्यूज 24 – तुमच्या मुलाच्या हातात इलेक्ट्रॉनिक उपकरण दिले की ते शांत बसते, हे वेगळे सांगायची गरज नाही. पण अनिर्बंध स्क्रीन टाईम मुलांसाठी अजिबात चांगला नाही. स्क्रीन टाईम जास्त असेल तर स्थूलपणा, आक्रमक वागणूक अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे मुले समाजापासून तुटतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देत आहोत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा आणू शकता.

तुमचे मूल वेगळे राहू लागले आहे का? तुमच्या मुलाला/मुलीला त्याचे तिचे आवडते कार्टून पाहायचे असल्यामुळे ती जेवण्यास किंवा शाळेत जाण्यास टाळाटाळ करत आहे का? सतत टीव्ही, टॅब्लेट किंवा फोन पाहण्यासाठी तुमचे मूल हट्ट करत आहे का? असे असेल तर स्क्रीन टाईमवर मर्यादा घालण्यासाठी तुम्ही ताबडतोब पावले उचलणे आवश्यक आहे. कारण मुलांच्या वाढीसाठी टीव्ही, व्हिडियो, डीव्हीडी, व्हिडियो गेम्स आणि कम्प्युटरचा स्क्रीन टाईम शक्य तेवढा कमी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तसे केल्यास तुमचे मूल कृतीशील, सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होईल.

तुमचे मूल उपकरणांना चिकटून बसू नये यासाठी खालील मार्गदर्शक तत्वांचा वापर करता येऊ शकतो:

१.       वेळापत्रक निश्चित करा – पालकांना आपल्या पाल्यांसाठी नीट वेळापत्रक आखून देणे आवश्यक आहे. तुमचे मूल त्या वेळांचे पालन करत असल्याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. मुलाला दरडावणे किंवा ओरडणे हितावह नाही. वेळ पाळली जाण्यासाठी तुम्ही टायमरचा वापर करू शकता.

२.       तंत्रज्ञानरहीत झोन तयार करावा – तुम्ही तुमच्या घरात तंत्रज्ञानरहीत झोन तयार करावा. म्हणजेच डायनिंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅब्लेटला मज्जाव करण्यात यावा. असे केल्याने तुम्ही आणि तुमचे मूल सुसंवाद साधू शकाल, एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे वेळ घालवू शकाल आणि तुमच्यातील नाते घट्ट होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तुम्ही डिजिटल डिटॉक्सचाही विचार करू शकता (हा असा काळ असतो ज्यावेळी मोबाईल फोन, कम्प्युटर आणि इतर कोणतेही उपकरण वापरायचे नसते, कारण ती व्यक्ती या उपकरणांचा अति वापर करत असते). त्यामुळे पालकांनो, ताबडतोब हे पाऊल उचला.

३.       तुमचे मूल वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांविषयी जाणून घ्या –

 सोशल मीडियामध्ये झालेली सुधारणा आणि त्याचे वेड यामुळे मुलांना तंत्रज्ञान पटकन समजते आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक्सविषयी बरीच माहिती असते. त्यामुळे पालक म्हणून तुम्हीही तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळविली पाहिजे. त्यामुळे सोशल मीडियाच्या संभाव्य धोक्यांविषयी तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकाल. तुम्हालाच मानांकने माहिती नसतील तर तुम्ही तुमच्या मुलांना हिंसक गेम खेळण्यापासून परावृत्त करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही स्वत: तंत्रज्ञानाची माहिती करून घ्या आणि त्याचा तुमच्या मुलांवर काय परिणाम होऊ शकतो, ते जाणून घ्या. तुमची मुले पाहत असलेल्या कार्यक्रमांची माहिती नोंदवून ठेवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

४.       तुमच्या मुलांना इतर इंटरेस्टिंग अॅक्टिव्हिटींसाठी प्रोत्साहन द्या – आजकाल मुलांना पटकन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे व्यसन लागू शकते. त्यामुळे त्यांना सुदृढ जीवनशैली अंगीकारण्यास मदत करा, बागकाम, वाचन, खेळ आणि संगीतासारख्या इतर गोष्टींसाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे मुले काहीतरी नवीन शिकू लागतील. स्क्रीन टाईम ही एक सुविधा आहे आणि हा त्यांचा हक्क नाही हे लक्षात ठेवा.

Leave A Reply

Your email address will not be published.