बसपा आणि काँग्रेस ‘या’ राज्यात लढविणार लढवणार एकत्रित निवडणूक

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –पुढील महिन्यात देशभरात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत असून यामध्ये महाराष्ट्राबरोबरच हरियाणामध्ये देखील विधानसभा निवडणूक होणार आहे. यामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि मायावती यांचा बहुजन समाज पार्टी हे दोन्ही पक्ष हि विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार आहेत.

भाजपला या निवडणुकीत टक्कर देण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. यासाठी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा यांनी मायावती यांच्याशी चर्चा देखील केली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रचार समितीचे प्रमुख भूपिंदर सिंह हुड्डा यांनी देखील मायावती यांच्याशी चर्चा केली.

हरियाणामध्ये बीएसपीची दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीशी युती होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी या पक्षाशी असणारी युती तोडली. त्यानंतर मायावतींनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते कि, बसपा हा राष्ट्रीय पक्ष असून जागावाटपात त्यांची भूमिका चुकीची असल्याने आम्ही युती तोडण्याचा निर्णय घेतला.

काही महिन्यांपूर्वीच आयएनएलडी बरोबर होती बसपा

लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बसपाने आयएनएलडी बरोबर आघाडी केली होती. त्याचबरोबर त्यांनी हरियाणामध्ये अनेक स्थानिक पक्षांबरोबर युती आघाडी केली होती. मात्र आता त्यानंतर मायावती काँग्रेसबरोबर हात मिळवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

दलितांची मते वळविण्याचा प्रयत्न

भाजपसाठी दलित मते हे मोठा चिंतेचा विषय आहे. काँग्रेसने नुकतेच कुमारी शैलजा यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची कमान सोपवली आहे. त्यामुळे मायावती यांच्याबरोबर हातमिळवणी करून दलित मते आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

Leave A Reply

Your email address will not be published.