पाकिस्तानने ओलांडल्या साऱ्या मर्यादा ! विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केला ‘बेली डान्स’ (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक संकटाशी झुंजत असलेला पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या वर्तणुकीमुळे जगासमोर स्वत:चा अपमान करून घेताना दिसत आहे. आर्थिक तंगीचा सामना करत असलेला पाकिस्तान विदेशी गुंतवणूक (foreign investment) आणण्याचा प्रत्येक प्रयत्न करत आहे. विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पाक खालच्या हरकती करताना दिसत आहे. याचे उदाहरण पूर्व सोव्हिएत संघाचा हिस्सा असलेल्या अजरबैजान देशात पाहायला मिळाले. असे सांगितले जात आहे की, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या कार्यक्रमात बेली डान्सचा कार्यक्रम ठेवला होता.

पाकिस्तानची सीमा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (SCCI) पेशावरने अजरबैजानची राजधानी बाकूमध्ये गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले होते. याचा उद्देश पाकिस्तानातील खैबर पख्तूनखवामध्ये विदेश गुंतवणूक वाढवणं हा होता. पाकिस्तानची इच्छा आहे की, खैबूर पख्तूनखवामध्ये विदेश गुंतवणुकीला चालना मिळावी. यामुळे तेथील आर्थिक परिस्थिती सुधारेल. या कार्यक्रमात सुरुवातीला तेथे उपस्थित गुंतवणूकदारांना पाकिस्तानच्या खैबूर पख्तूनखवामध्ये उपस्थिती गुंतवणुकीची माहिती देण्यात आली. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर उपस्थित प्रत्येकज हैराण झाला. कार्यक्रमादरम्यान अनेक बेली डान्सर्स स्टेजवर आल्या आणि त्यांनी डान्स करायला सुरुवात केली.

बेली डान्सर्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यानंतर आता इम्रान खान आणि पाकिस्तान सरकारवर प्रचंड टीका होत आहे. ट्विटरवर लोक विचारत आहे की, हाच आहे नवीन पाकिस्तान? एका युजरने लिहिले आहे की, भारतासारखा देश चंद्रावर आपले यान पाठवत आहे आणि पाकिस्तान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बेली डान्स करवत आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

Leave A Reply

Your email address will not be published.