श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाची ऐतिहासिक गणेशमूर्ती

0

पुणे : एन पी न्यूज 24 – अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुण्यात कार्यरत होते ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांचे पूर्ण नाव. भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. यावरूनच त्यांचे रंगारी हे नाव रूढ झाले. भाऊसाहेबांच्या मनात ब्रिटीश साम्राज्याविरोधात कारवायांसंदर्भात विचार सुरू होता. यातूनच गणेशोत्सवाचा विचार पक्का झाला. त्यांनी आपल्या वाड्यात साथीदारांसोबत बैठक बोलवली आणि पुण्यात तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१८९२ मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब रंगारी गणपती, नानासाहेब खासगीवाले गणपती आणि गणपतराव घोटावडे यांचा गणपती या तीन गणपतींची दहा दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीदिवशी मिरवणूक काढण्यात आली. यातूनच पुढे राजकीय क्रांतिकारी चळवळीला वेग आला. भाऊसाहेब रंगारी गणपतीपुढे पुढाऱ्यांची, समाजसुधारकांची, क्रांतिकारकांची भाषणे झाली. लोकमान्य टिळक, पंडित मदनमोहन मालवीय, बिपिनचंद्र पाल, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, राजगुरू अशा अनेकांनी भाषणे आणि भेटी देऊन गणेशोत्सवाला प्रोत्साहन देऊन देशकार्यासाठीचे बीज रोवले.

त्या काळी श्रीमंत भाऊ रंगारी यांनी राक्षसासारख्या समाजद्रोही प्रवृत्तींचा नाश करणा-या विघ्नहराच्या मूर्ती आजही पुणेकरांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या इको – फ्रेंडली मूर्ती आजही जशाच्या तश्या बसविल्या जातात. यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, छत्रपती राजाराम मंडळ, होनाजी तरुण मंडळ, तरवडे गणपती आदिंचा समावेश होतो. मंडळाचा उत्सव १८९२ पासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरु आहे. हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती म्हणून या मूर्तींची ओळख आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.