चंद्रयान – 2 : चंद्रावर ‘लॅन्डर’ विक्रम सुरक्षित, संपर्कासाठी पयत्न सुरू, इस्त्रोनं दिली ‘खुशखबरी’

0

एन पी न्यूज 24 – चंद्रयान – 2 चं ‘लॅन्डर’ विक्रम हे चंद्रावर सुरक्षित असल्याची माहिती इस्त्रोनं दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लॅन्डर विक्रम हे एकदम सुरक्षित असून त्याला कुठलीही इजा झालेली नाही. लॅन्डर विक्रम बरोबर संपर्क करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न इस्त्रो करीत आहे.

चंद्रापासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना इस्त्रोचा यानासोबत असलेला संपर्क तुटला होता, ऑर्बिटर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत होतं. रविवारी इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी ऑर्बिटरनं लॅन्डर विक्रमची छायाचित्रे पाठवल्याचे सांगितले. त्यावेळी देखील त्यांनी लॅन्डर विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.