लव्ह जिहाद ! हिंदू बनून मुलीला फसवलं, जबरदस्तीने केलं धर्मपरिवर्तन आणि पुढं ‘निकाह’

0

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बरेलीमधून पुन्हा एक लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. एका युवकाने हिंदू असल्याचं सांगत एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला नंतर तिला मुस्लिम धर्म स्विकारण्यास जबरदस्ती केली. यानंतर तिच्यसोबत निकाह केला. आरोपी युवकाने तिचे आयुष्य नरक बनवले. तिला तो त्रास देऊ लागला. यानंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली आणि आपल्यासोबत होणाऱ्या छळाबाबत सांगितले. मोहम्मद अजहरने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचा एमएमएस बनवला आणि जबरदस्तीने तिला मुस्लिम धर्म स्विकारायला लावत तिच्यासोबत निकाह केला.

एमएमएस बनवून मित्रांसोबत झोपण्यासाठी करत होता ब्लॅकमेल

निकाह करून मोहम्मद त्या तरुणीला घरी घेऊन आला. यानंतर त्याने तिचे आयुष्य नरकाहूनही वाईट केले. पीडित तरुणीने आरोप केले आहेत पती तिला बेल्टने मारत होता. अनेकदा त्याने खूप इजा पोहोचवली आहे. तिचा एमएमएस बनवून सोशलवर व्हायरल करण्याची धमकीही देत असे. इतकेच नाही तर तो तिला मित्रांसोबत झोपण्यासाठी ब्लॅकमेलही करत होता. तिने नकार देताच तिला मारहाण करत असे.

अजहर आणि इतर साथीदारांवर FIR दाखल

सीओ सीटी कुलदीप कुमार यांनी या प्रकरणी सांगितले की, “बारादरी पोलीस ठाणे क्षेत्रातील जगतपूरमधील रहिवासी मोहम्मद अजहरने लग्नाचं आमिष दाखवत दुसऱ्या धर्मातील मुलगी निगोही जिल्हा शाहजहांपूरमध्ये तिच्या जाति धर्माचा असल्याचे सांगत शरीरसंबंध ठेवले. यानंतर तिचा संबंध ठेवताना व्हिडीओ बनवला. यानंतर तिला ब्लॅकमेल करत धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले. तिच्यासोबत निकाह केला. या प्रकरणी अजहर आणि त्याचे चार साथीदार रिक्की, विक्की, जिशान आणि आणखी एका विरोधात बारादरी ठाण्यात कलम 323, 506 आणि 376 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लव्ह जिहादचे असे अनेक प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त 

Leave A Reply

Your email address will not be published.