विधानसभेसाठीची काँग्रेसची पहिली यादी तयार, ‘या’ तारखेला होणार जाहीर

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –   सर्वच पक्षांमध्ये विधानसभेची तयारी सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. काल दिल्लीमध्ये काँग्रेसच्या उच्च नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील ६६ जागांवर नावांची निश्चिती झाल्याचे समजते. विजय वडेट्टीवार यांनी १० सप्टेंबर रोजी या नावांची घोषणा होणार असल्याची अधिकृत माहिती दिली.

आघाडीच्या विधानसभेच्या मुख्य प्रचाराला लवकरच सुरुवात होणार आहे त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम किंवा धुळ्यामधून फुटण्याची शक्यता आहे. १० सप्टेंबर पर्यंत राष्ट्रवादी सोबतची बोलणी पूर्ण होतील आणि त्यानंतरच आघाडीच्या जागांचा निर्णय घोषित केला जाणार आहे. आघाडीमध्ये ५० – ५० फॉर्म्युल्यानुसार जागा वाटप होणार आहे आणि त्यातही १२ जागा मित्र पक्षानं सोडल्या जातील.

हर्षवर्धन पाटील यांच्यावर टांगती तलवार

लोकसभेला सुप्रिया सुळेंना मदत करूनही या विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी जागा सोडणार नाही. तसेच लोकसभेत दिलेला शब्द पवार पाळणार नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले होते. त्यामुळे ते पक्षांतराच्या तयारीत आहेत मात्र काँग्रेसकडून त्यांच्याशी बोलणी सुरु आहेत.  शरद पवार यांनी देखील त्यांची नाराजी दूर करण्याचे आश्वासन दिलं आहे. मात्र याच निर्णय येत्या १० सप्टेंबरलाच पहायला मिळेल.

भुजबळांच्या निर्णयाकडे सगळ्यांचेच लक्ष
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा प्रत्येक आठवड्यात सुरु होते मात्र भुजबळ अजून हे मानायला तयार नाहीत की ते शिवसेनेत जात आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये विधानसभा नेमकी कोणाविरुद्ध कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.