खंत तर आहेच पण योग्य वेळवर ‘खुलासा’, निवृत्‍तीवर क्रिकेटर युवराज सिंहचं मोठं ‘वक्‍तव्य’

0
नवी दिल्ली :एन पी न्यूज 24 – भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह याने नुकतीच काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यानंतर तो पहिल्यांदाच त्याच्या निवृत्तीवर बोलण्यासाठी समोर आला असून त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरे देत छान  संवाद साधला. त्याचबरोबर निवृत्तीपूर्वी ज्या गाष्टींची खंत होती त्यावर देखील मोकळेपणाने उत्तरे दिली.
भारताने जिंकलेल्या दोन आयसीसी वर्ल्डकपमध्ये म्हणजेच 2007 आणि 2011 मधील दोन्ही स्पर्धेत युवराजचा भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा होता. या मुलाखतीत सुरुवातीला त्याने सांगितले कि,त्याने कुणाच्याही शिफारशीवरून क्रिकेट खेळले नसून त्याने त्याच्या मेहनतीने आणि प्रतिभेने इतक्या वर्ष भारतीय संघात स्थान मिळवले होते. त्याने या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे देत भारतीय निवड समितीवर देखील टीका केली.मैदानात निरोप न मिळायची खंत
या प्रश्नावर बोलताना युवराज म्हणाला कि, मी पूर्णपणे याला खंत नाही म्हणू शकत मात्र जे काही क्रिकेट खेळलो ते स्वतःच्या  मेहनतीवर खेळलो. त्यामुळे माझ्या नावाची कुणालाही शिफारस करावी लागली नाही. निवृत्तीचा निर्णय अवघड होता. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात हि वेळ येतेच, त्यामुळे निर्णय घ्यावा लागतो.

हा प्रश्न कर्णधाराला विचारा
युवराजला विचारण्यात आले कि, तुला अजुन संधी का देण्यात आली नाही त्यावर तो म्हणाला कि, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी बीसीसीआय किंवा भारतीय कर्णधाराला विचारायला हवा. मी माझ्या जीवनात खूप क्रिकेट खेळलो. माझ्या जीवनात काही खंत आहे मात्र वेळ आल्यानंतर मी ती बोलून दाखवेल.

4थ्या क्रमांकावर भाष्य
या प्रश्नावर बोलताना तो म्हणाला कि, भारतीय संघाला सध्या एका उत्तम अशा खेळाडूची चौथ्या क्रमांकासाठी गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले. त्याचबरोबर केएल राहुल  याला संधी दिल्यानंतर देखील चांगली कामगिरी होत नसेल तर दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याचे मत त्याने व्यक्त केले.

दरम्यान, युवराज सध्या विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा आनंद घेत असून लवकरच तो एका नवीन लीगमध्ये आपल्याला खेळताना दिसून येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.