व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

0

एन पी न्यूज 24 – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. खास व्हॅनिला आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात.

अशी तयार करा व्हॅनिला आइस्क्रिम

साहित्य
* अर्धा टिन कंडेन्स्ड मिल्क
* १ कप दुध
* २ कप ताजे क्रीम
* २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
* ६ मोठे चमचे साखर
* २ छोटे चमचे व्हॅनिला एसेंस

थोड्या दूधात कार्नफ्लावर मिसळा. एका भांड्यात दूध, कंडेन्स्ड मिल्क व साखर मिसळून घट्ट मिश्रण बनवा. त्यात कॉर्नफ्लावर टाकून सारखे हलवत रहा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर क्रीम व एसेंस मिसळून मिक्सर मध्ये फेटा व फ्रीज मध्ये ठेवा.

Attachments area