चहापत्‍तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय

0

एन पी न्यूज 24 – अकाली केस पांढरे होण्याची समस्या सध्या वाढली आहे. तारूण्यातच केस पांढरे झाल्याने सध्या महिलांसह पुरूषसुद्धा विविध प्रॉडक्टस वापरताना दिसतात. परंतु, या प्रॉडक्ट्स उपयोग न झाल्याने अनेकांची निराशा होते. केस पांढरे होण्याची विविध कारणे आहेत. अनुवंशिकता, एखादा आजार, मानसिक ताण, जीवनशैली ही कारणे या समस्येमागे असू शकतात. या समस्येवर काही रामबाण आयुर्वेदिक उपाय असून त्यांची माहिती घेवूयात.

हे उपाय करा

* दोन ग्लास पाण्यात चार चमचे चहापत्ती आणि थोडे मीठ टाकून उकळा. पाणी कोमट झाल्यानंतर त्याने डोके धुवून घ्या.

* आवळ्याचे तुकडे खोबरेल तेलात काळे होईपर्यंत उकळून घ्या. हे थंड झाल्यानंतर गाळून डोक्याला लावा.

* आठवड्यातून एकदा शुद्ध तुपाने डोक्याची मसाज करा. केस धुताना शाम्पू अथवा साबण लावू नका.

* पंचवीस ते तीस कडीपत्ते घेवून खोबरेल तेला गरम करा. ही पाने जळाल्यावर थंड करून तेल केसांना लावा.

* कच्च्या कांद्याचा रस काढून घ्या. यामध्ये समप्रमाणात खोबरेल तेल मिसळून केसांच्या मुळांवर मसाज करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.