डोक्याला लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर

0

एन पी न्यूज 24 –  केसात कोंडा झाला असल्यास काही घरगुती उपायांनी ही समस्या दूर होऊ शकते. कोंडा ही एक सामान्य समस्या आहे. कोंडा दूर करण्याच्या काही सोप्या पद्धतींची माहिती आपण घेणार आहोत. हे उपाय घरच्याघरी करता येण्यासारखे असून यासाठी लागणारे पदार्थ घरातच उपलब्ध असतात.

हे आहेत उपाय

* कोरफडीच्या जेलने केसांची मसाज करा. अध्र्या तासानंतर केस गार पाण्याने धुऊन घ्या.

* मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी याची पेस्ट बनवून ३० मिनिटे केसांना लावा. यानंतर केस धुऊन घ्या.

* मोहरीच्या कोमट तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. असे दोन दिवसांतून एकदा महिनाभर करत राहा.
* ग्लिसरीन आणि गुलाब जल १/३ या प्रमाणात मिसळून एका बाटलीमध्ये ठेवा. हे नियमित केसांच्या मुळांना लावा.

* खोबऱ्याच्या तेलात कापूर मिसळून ठेवा. अंघोळीच्या अर्धा तास अगोदर याने केसांची मसाज करा.

* एक ग्लास पाण्यात चार मोठे चमचे बेसन मिसळून केसांवर लावा. एका तासानंतर केस धुऊन घ्या.

* टोमॅटोच्या पेस्टमध्ये एक चमचा मुलतानी माती मिसळा. हा पॅक केसांना लावा. १५ ते २० मिनिटांनंतर केस धुऊन घ्या.

* आंबट दह्यामध्ये थोडे पाणी मिसळून केसांना लावा. ३० मिनिटांनंतर केस धुऊन घ्या.

* तूरडाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही बारीक करून केसांना लावा. अध्र्या तासानंतर केस धुऊन घ्या.

* ४-५ लिंबू कापून दोन लिटर पाण्यासोबत उकळा. हे पाणी कोमट करून केस धुऊन घ्या. कोंडा दूर होईल आणि केस मुलायम, चमकदार होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.