महायुतीचं ठरलं ! शिवसेना 110, भाजप 160, मित्र पक्ष 18

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – महायुतीच्या शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक यशस्वी ठरली असून त्यात कोणी किती जागा लढवायच्या याचा फार्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना अगोदर पासून ५० -५० टक्के जागा विभागून घ्याव्यात अशा मागणीवर अडून होती. मात्र, मित्र पक्षांना जागा देऊन उरलेल्या जागा ५० -५० टक्के वाटून घेऊ अशी भाजपाची भूमिका होती. त्यात भाजपामध्ये इनकमिंग खूप होत असल्याने ते पुन्हा स्वतंत्रपणे लढण्याचा नारा देतात की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा अतिशय शांतपणे सोडविला असून कमी जागांवर लढण्यास त्यांनी शिवसेनेला मनविण्यास ते यशस्वी ठरले आहेत.

शिवसेना आपल्या ६३ जागांसह एकूण ११० जागा लढविणार आहे. तर भाजपा आपल्या विद्यमान २१३ जागांसह १६० जागी लढणार आहे. या दोन्ही पक्षात झालेल्या इनकमिंगमुळे काही जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी आमदार या पक्षांमध्ये आले पण त्यांचा मतदारसंघ हा दुसऱ्या पक्षाच्या वाटेला आहे. अशा काही मतदारसंघामध्ये अदला बदल करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले असल्याने आता जुन्या १० वर्षापूर्वीच्या फॉर्म्युल्यापेक्षा आता नव्याने दोन्ही पक्षांनी आपली ताकद लक्षात घेऊन जागा लढवाव्या यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.