योगायोग ! इंग्लंडच्या संघात ‘शेम टू शेम’ 7 खेळाडू

0

नवी दिल्ली :एन पी न्यूज 24 – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत  शेवटच्या आणि चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 170 धावा झाल्या आहेत. मात्र या सामन्यात एक विचित्र योगायोग घडला आहे. या संघातील सात खेळाडू हे शेम टू शेम आहेत. मात्र नक्की काय असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच डोकावला असणार…

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरपर्यंत 4 बाद 170 धावा केल्या असून खराब हवामानामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून संघ जाहीर केल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर सर्वांना त्यांची नावे पाहून धक्का बसला. कारण इंग्लंडच्या संघातील अकरापैकी सात खेळाडूंची मानावे हि ‘J’ या इंग्रजी अक्षरावरून सुरु होत आहेत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. या सात खेळाडूंमध्ये जो डेनली (Joe Denly), जो रूट (Joe Root), जोफ्रा आर्चर (Jofra Archer), जॅक लीच (Jack Leach), जेसन रॉय (Jason Roy), जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), जोस बटलर (Jos Buttler) या सात खेळाडूंची नावे हि j या अक्षरावरून सुरु होत आहेत.

रम्यान, या ऍशेस मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी असून हा सामना निर्णायक असल्याने अटीतटीचा होणार यामध्ये शंका नाही. मात्र आज दुसऱ्या दिवशी कोण उत्तम खेळ करणार यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.