शरीरात जलद गतीने वाढू शकते रक्त, करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय, जाणून घ्या

0

एन पी न्यूज 24 – मनुष्याच्या शरीरात योग्यप्रमाणात रक्त नसल्यास त्याचे दुष्परिणाम त्याच्या शरीरावर आणि आरोग्यावर दिसू लागतात. यामुळे विविध आजारांची लागण होते. आजारांशी लढण्याची ताकद शरीरात राहत नाही. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवणारे काही आयुर्वेदिक उपाय असून ते जाणून घेवयात.

हे आहेत उपाय

* शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी शेंगदाणे आणि गुळाचे एकत्रितपणे चावून-चावून सेवन करावे.

* शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी दररोज सफरचंदचे ज्यूस घ्यावे. बीटच्या एक ग्लास रसामध्ये चवीनुसार मध मिसळून दररोज याचे सेवन करावे. या ज्यूसमध्ये लोह तत्त्व जास्त असते.

* तुम्ही तुमच्या आहारात गहू, मुग, हरभरे, मटकी अंकुरित करून त्यावर लिंबू पिळून सकाळी नाश्त्यामध्ये याचा समावेश करा.

* पिकलेल्या आंब्यातील गर गोड दुधासोबत सेवन करा. अशाप्रकारे आंब्याचे सेवन केल्यास रक्त लवकर वाढते.

* शिंघाडा शरीरात रक्त आणि ताकद दोन्ही वाढवतो. कच्चा शिंघाडा खाल्ल्यास शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर जलद गतीने वाढतो.

* मनुका, डाळी आणि गाजराचे नियमितपणे सेवन करावे आणि रात्री झोपताना दुधामध्ये खारीक टाकून दुध प्यावे. या उपायाने रक्त वाढण्यास मदत होईल.

* डाळिंब, पेरू, चिकू, सफरचंद, लिंबू इत्यादी फळांचे जास्तीत जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्त वाढेल.

* एक ग्लास टोमॅटो रस दररोज प्यायल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. यासाठी तुम्ही टोमॅटोचे सूपसुद्धा बनवून घेऊ शकता.

* पालक, कोथिंबीर, मटार आणि पुदिना या भाज्यांचा दररोजच्या आहारात समावेश करावा.

* शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी दररोज लसुन आणि मिठाच्या चटणीचे सेवन करावे. यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

* २ चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्यानंतर पाणी गाळून तिळाची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळून याचे सेवन करा. या उपायाने रक्त वाढू लागेल.

* आवळा आणि जांभळाच रस सम प्रमाणत घेऊन याचे सेवन केल्यास शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढण्यास मदत होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.