बदाम कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

बदाम कुल्फी
5th September 2019

एन पी न्यूज 24 – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. खास बदाम कुल्फीची रेसिपी जाणून घेवूयात.

अशी तयार करा बदाम कुल्फी

साहित्य
* ३ कप दुध (होल मिल्क)
* एक चतुर्थांश कप ताजा मावा (साधारण ४ टेस्पून)
* अर्धा ते पाउण कप साखर
* अर्धा कप बदामाचे काप
* २ टिस्पून कॉर्न फ्लोअर
* अर्धा टिस्पून वेलची पूड
* चिमूटभर केशर

बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच ३-४ मिनीटांनी साखर घालावी. अर्धे होईपर्यंत आटवावे. सारखे ढवळत राहावे. मावा हाताने मोकळा करून घ्यावा. दुध घट्टसर झाले कि वेलची पूड, केशर, मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व मिक्स करावे. मिश्रण थोडे कोमट झाले कि कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवावे. कुल्फी घट्ट झाली खावी.

Attachments area