कांदा कापताना का येतात अश्रू ? या सोप्या पद्धतींनी टाळता येईल ही समस्या

एन पी न्यूज 24 – कांदा कापताना डोळे झोंबतात आणि अश्रू येतात, हा अनुभव सर्वांनाच येतो. कांद्यातील पातळ लेयरमध्ये अमीनो अॅसिड अल्फोक्साइड्स असतात. कांदा कापताना सल्फर गॅस होतो. हा गॅस डोळ्यांपर्यंत पोहचताच, डोळे झोंबतात आणि अश्रू येतात. कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येऊ नये यासाठी काही सोप्या पद्धती आहेत.
हे उपाय करा
१ कांदा कापताना जवळच मेणबत्ती लावा. कांद्यातून निघणारा गॅस डोळ्यांना त्रास देणार नाही.
२ कांदा कापताना शिटी वाजवा. याच्या एयरफ्लोमुळे कांद्याचा गॅस डोळ्यांना त्रासदायक ठरणार नाही.
३ कांदा कापण्यापूर्वी थोडावेळ फ्रिजरमध्ये ठेवा. यानंतर कापा. डोळ्यातून अश्रू निघणार नाही.
४ कांदा नेहमी धारधार सुरीने कापा. यामुळे डोळ्यांना झोंबण्यासाठी कारणीभूत एंजाइन्स कमी प्रमाणात रिलिज होतील.
५ प्रथम कांद्याचे दोन भाग करून पाण्यात टाका. आता कांदा पाण्यात ठेवूनच कापा.
६ कांदा कापताना दोन ते तीन वेळा सुरीवर qलबाचा रस लावा.
७ बोर्डवर थोडे व्हाइट व्हिनेगर लावा. नंतर कांदा कापा.
८ चाकू थोला ओला करून त्याव मीठ लावून नंतर कांदा कापा.
९ कांदा कापताना एक ब्रेडचा तुकडा हळुहळु चावा.
१० तोंडाने श्वास घ्या आणि जीभ थोडी बाहेर ठेवा. यामुळे कांद्यातील गॅस प्रथम जिभेच्या संपर्कात येईल.
११ खिडकी उघडून अथवा फॅन सुरू करून कांदा कापा.
१२ कांदा कापण्याची सुरूवात कधीही कांद्याची मुळं असलेल्या भागाकडून करू नका. कारण गॅस येथून रिलिज होत असतो.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय