आजचे राशीभविष्य – गुंतवणूक करताना सावधान, ‘या’ राशीला सोसावे लागेल ‘नुकसान’

0

एन पी न्यूज 24 –
मेष रास –
सकाळचा दिवस चांगला असेल. संध्याकाळी मात्र वाद होण्याची शक्यता आहे. नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यात उत्तम वेळ आहे. धनप्रप्तीची शक्यता आहे.

वृषभ रास –
कुटूंबात मंगलकार्य पार पडेल. कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत यश मिळेल.

मिथुन रास –
परदेशात नोकरी मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. व्यावसायात आवक वाढेल. शेअर बाजारातील गुंतवणूक नुकसानकारक ठरेल.

कर्क रास –
मुलांची काळजी लागून राहिल. अतिरिक्त खर्च होईल. तुमच्या व्यवहारामुळे व्यवसायात यशप्रप्ती निश्चित आहे.

सिंह रास –
परोपकाराची भावना तुम्हाला सुखी बनवेल. मित्र सहकार्य करतील. धार्मिक कामात रुची घ्याल. समाजात मान सन्मान वाढेल.

कन्या रास –
सकाळपासून कुटूंबात तणाव राहिल. नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. संध्याकाळपर्यंत अनेक चिंता मिटतील.

तुळ रास –
अपरिचीत व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. सावध रहा. काळानुसार स्वत:मध्ये बदल करा. अडून राहिलेली कामे पार पडतील.

वृश्चिक रास –
व्यापारात फायदा होईल. सरकारी कामात समस्या येऊ शकतात. परंतू सरकारी कर्मचाऱ्यांना आजचा दिवस फायदेशीर असेल. दूर प्रवासाचा योग आहे.

मकर रास –
वाडवडिलांचा सल्ला घेऊन काम करा. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांना आज लाभ होईल. मित्रांबरोबर प्रवासाचा नियोजन कराल.

कुंभ रास –
व्यवसायात लाभ होईल. नोकरी करत असाल तर प्रगती होईल. कौटूंबिक जीवन सुखी राहिल.

धनू रास –
तुमच्यामुळेच समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलावी लागेल.

मीन रास –
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्रप्ती निश्चित आहे. स्पर्धेत हमखास यश मिळेल. आई वडिलांचा आदर करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

 

Leave A Reply

Your email address will not be published.