तृतीयपंथी असतात ६ प्रकारचे, हा आहे एल.जी.बी.टी.आय.क्यू. चा अर्थ

0
एन पी न्यूज 24 – तृतीयपंथीय त्यांची ओळख एल.जी.बी.टी.आय.क्यू अशी करून देतात. याचा अर्थ नेमका काय आहे हे अनेकांना माहितीच नसते. त्यांच्यातही सहा वर्ग आहेत. एल.जी.बी. हे व्‍यक्‍तीच्‍या शारीरिक आकर्षणावरून निश्चित केले जाते. तर टी.आय.क्यू हे व्यक्तीच्या गुप्‍तांगावरून ठरते.

एल – लेस्बियन
ज्‍या महिलेला अन्य महिलेविषयी आकर्षण वाटते तिला लेस्बियन म्‍हणतात. लेस्बियनपैकी जिचे व्यक्तिमत्व पुरुषासारखे असते तिला बुच म्‍हणतात. ती पुरुषांरखेच बोलते, कपडे घातले. पण, काही लेस्बियन पुरुषांसारखे राहत नाहीत. त्‍यांना फेम म्‍हटले जाते.

जी – गे
एक पुरुष अन्य पुरुषाकडे आकर्षित होतो त्‍यास गे म्‍हणतात. मात्र, या शब्‍दांचा वापर सर्वच समलैंगिक व्‍यक्‍तींबाबत केला जातो. यात लेस्बियन, गे, बायसेक्सुअल असे सर्वच आहेत. गे कम्यूनिटी किंवा गे पीपल असेही म्हटले जाते.

बी – बायसेक्सुअल
जर कुणाला पुरुष आणि स्‍त्री अशा दोन्‍ही लिंगाच्‍या व्‍यक्‍ती आवडत असतील. त्‍यांच्‍यासोबत संबंध  ठेवायची इच्‍छा असेल तर अशा स्‍त्री किंवा पुरुषाला बायसेक्सुअल म्‍हणतात.

टी – ट्रांसजेंडर

जन्‍माच्‍या वेळी अशा व्यक्तीचे लिंग वेगळे असते. आणि नंतर ती स्‍वत:ला वेगळ्या लिंगाची समजते. यास ट्रांसजेंडर म्‍हणतात. ट्रांसजेंडर व्यक्ती मनाप्रमाणे ड्रेस बदलते. तिला क्रॉस-ड्रेसरही म्‍हटले जाते. जे ट्रांसजेंडर हे औषधी, ऑपरेशन, हॉर्मोन रिप्सेलमेंट थेरेपी आणि सेक्स रीएसाइनमेंट सर्जरीने लिंग बदलून घेतात त्‍यांना ट्रांससेक्सुअल म्‍हटले जाते. यातही लेस्बियन ट्रांसजेंडर, गे ट्रांसजेंडर आणि बाईसेक्सुल ट्रांसजेंडर असे प्रकार आहेत.
आय – इंटर-सेक्स
जन्‍म झाल्‍यानंतर ती व्‍यक्‍ती पुरुष आहे की स्‍त्री हे कळतच नाही त्‍यांना इंटर-सेक्स म्‍हटले जाते. त्‍यावेळी डॉक्‍टरांना जे वाटते त्‍याच लिंगाच्‍या आधारे नाव ठेवले जाते. पुढे मोठे झाल्‍यानंतर ती व्‍यक्‍ती स्‍वत:ला पुरुष, स्‍त्री किंवा ट्रांसजेंडर यापैकी एक समजायला लागते.
क्यू- क्वीयर
काही लोकांना आपण कुठल्‍या लिंगाचे आहोत हेच निश्चित करता येत नाही. ते स्‍वत:ला स्‍त्री, पुरुष, ट्रांसजेंडर, लेस्बियन, गे किंवा बायसेक्सुअल असे काहीच म्‍हणून घेत नाहीत. त्‍यांना क्वीयर म्‍हणतात.
Leave A Reply

Your email address will not be published.