पुरुषांमध्ये कमी होत आहे ‘फर्टिलिटी’, जाणून घ्या ‘ही’ ७ कारणे

फर्टिलिटी
4th September 2019

एन पी न्यूज 24 –  पुरुषांच्या काही सवयींमुळे त्यांचे स्पर्म काउंट कमी होत आहे. विशेष म्हणजे या सवयींमुळे फर्टिलिटीवर परिणाम होत असल्याचे ८० टक्के पुरुषांना माहितीच नसते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. शरीराच्या तुलनेत अंडकोश पिशवीचे तापमान एक डिग्री कमी असते. याचे तापमान वाढल्यावर स्पर्म काउंट कमी होतो. काही सवयींमुळे अंडकोश पिशवीचे तापमान वाढते. मानसिक ताणतणावाचाही स्पर्म काउंटवर परिणाम होते. फर्टिलिटीवर परिणाम होण्याची विविध कारणे असून ती पुरूषांनी जाणून घेतल्यास या परिस्थितीमध्ये फरक पडू शकतो.

ही आहेत कारणे

१ सतत तणावाखाली राहणे


२ जास्त सोया प्रोडक्ट आहारात घेणे

३ नियमित नशा करणे

४ लॅपटॉप पायावर ठेवून काम करणे

५ परिपूर्ण झोप न घेणे

६ जास्त कॉफी न पिणे

७ टाइट कपडे घालणे