तरुणीला भररस्त्यात अर्धनग्न करून मारहाण, प्रेम केलं म्हणून ‘शिक्षा’

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – भारत देश हा सर्व धर्म समभाव मानणारा देश म्हणून ओळखला जातो. म्हणूनच देशात सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात. मात्र सर्वधर्म समभाव या शब्दांना काळिमा फासणारी एक घटना मध्यप्रदेशात घडली आहे.
मध्य प्रदेश मधील अलीराजपुरमध्ये दुसऱ्या जातीच्या तरुणावर प्रेम केलं म्हणून एका तरुणीची धिंड काढून बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, मुलीला अर्धनग्न अवस्थेत काही तरुण काठीने मारहाण करत घेऊन चालले आहेत. मुलगी मोठ मोठ्याने रडत पुढे जात आहे. मागून येणारे लोक त्या मुलीला मारत आहेत. एवढेच नाही तर मुलीने पळून जाऊ नाये यासाठी तिचा हात देखील पकडला आहे. मुलगी रडून रडून एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मला मारा, शिक्षा द्या परंतु गैरफायदा घेऊ नका.
मध्यप्रदेशातील माणुसकीला काळिमा फासणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशाही प्रकारचे लोक अजून देशात आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात प्रचंड चीड निर्माण होत आहे.