काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील भाजप प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता

0

पुणे : एन पी न्यूज 24 – काँगेसचे आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळं त्यांनी बुधवारी म्हणजेच आज कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता हर्षवर्धन पाटील देखील आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. मात्र अनेक कार्यकर्त्यांची त्यांनी हि विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्याची इच्छा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ते कार्यकर्त्यांचे ऐकतात कि काही वेगळा निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७ तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता ते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय आहे इंदापूरच्या तिढा –

राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांना लोकसभेला मदत करण्याच्या बदल्यात इंदापूरची जागा सोडण्याचा शब्द दिला होता. मात्र आता अजित पवार हि जागा काँग्रेसला सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेची सभा इंदापूरमध्ये घेतल्याने या बातमीला हवा मिळाली आहे. त्यामुळेच या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासून आघाडीच्या जागावाटपात हि जागा काँग्रेसकडे आहे. मात्र २०१४ मध्ये वेगळे लढल्यानंतर आ ठिकाणी राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादी हि जागा सोडणार नसल्याचे जवळपास नक्की झाल्याने हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सोलापूरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील दोन आमदारांनी आणि एका माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये माजी खासदार धंनजय महाडिक, आमदार जयकुमार गोरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.