द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

0

एन पी न्यूज 24 – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. खास द्राक्ष कुल्फीची रेसिपी जाणून घेवूयात.

अशी तयार करा द्राक्षांची कुल्फी

साहित्य

* ५०० ग्रॅम काळी द्राक्षं
* ३ लिटर दूध
* ५०० ग्रॅम साखर
* ड्राय फ्रूटस्चे काप
* २ थेंब द्राक्षाचा इसेन्स.

दूध उकळावे. त्यामध्ये साखर घालावे. आटून निम्म्याहून कमी होईल एवढे दाट करा. द्राक्षांचा रस काढून तोही उकळून दाट होईपर्यंत आटवावा. दोन्ही मिश्रणे पूर्णपणे गार झाल्यावर ती एकत्र करून इसेन्स टाकून मिक्सरमधून काढावीत. सुकामेव्याचे काप घालून मिश्रण कुल्फीच्या साच्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवा. १०-१२ तासांनी कुल्फीच्या साच्यातून कुल्फ्या काढाव्यात. या कुल्फ्यांच्या वरती द्राक्षांच्या पातळ स्लाइसेस ठेवून त्या खाण्यास द्याव्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.