फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

0

एन पी न्यूज 24 – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. खास फालूदा आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात.

अशी तयार करा फालूदा आइस्क्रिम

* २ कप व्हॅनिला आईस्क्रिम
* १ कप फालूदा शेव
* गुलाबाचे सरबत
* अर्धा कप ताजे क्रीम
* १ किलो दूध
* २ छोटे चमचे गुलाब एसेंस
* अर्धा कप बदाम व पिस्ते
* चार चमचे साखर

दूधात साखर टाकून आटवा. थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवा. वाढतांना एक आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाका त्यावर जमवलेले दूध टाका. मग व्हॅनिला आईस्क्रिम टाका व क्रीम टाकून वर बदाम पिस्ते टाका. यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस घालून त्याची चव वाढवू शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.