निरोगी आरोग्यासाठी जिभेची स्वच्छता आवश्यक, ट्राय करा ‘हे’ उपाय

0

एन पी न्यूज 24 – जीभ हा शरीराचा खुप महत्वाचा भाग आहे. जीभेमुळे चव कळते, अन्न गिळता येते, बोलता येते, असे विविध फायदे आहेत. जीभेचे आरोग्य बिघडले तर त्याचा खुप गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र, जीभेच्या स्वच्छतेकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. जीभेची स्वच्छता राखल्यास तीचा रंग गुलाबी दिसतो. तर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास जीभ पांढरी होते. यामुळे तोंडाला दुर्गंधी सुद्धा येते. जीभेची स्वच्छता कशी करावी, याची माहिती घेवूयात.

 

तेल
तेलाचा वापर केल्यास जीभ स्वच्छ आणि गुलाबी होते. सकाळी ब्रश करण्याआधी थोडे खोबरेल तेल कोमट पाण्यासोबत तोंडात टाकून गुळण्या करा.

अ‍ॅलोवेरा ज्यूस
अँटी-माइक्रोबाइल असल्या कारणाने हे बॅक्टेरीया दूर करते, श्वासाचा वास दूर होतो. एक चमचा अ‍ॅलोवेरा ज्यूस तोंडात काही मिनिट ठेवा. हे बाहेर काढल्यानंतर एक चमचा अ‍ॅलोवेरा ज्युस प्या. दोन आठवडे हे करा.

हळद
जीभेच्या स्वच्छतेसाठी हळद खुप फायदेशीर आहे. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. अर्धा चमचा हळदीच्या पावडरमध्ये लींबूचे काही थेंब मिळवुन पेस्ट करा. या पेस्टने जिभ घासा. कोमट पाण्याने गुळण्या करा.

मीठ
मीठाचा खारटपणा जीभेवरील घाण आणि डेड सेल्स दूर करते. याचे अँटीसेप्टीक गुण बॅक्टेरिया दूर करुन श्वासाच्या वासाची समस्या दूर करते. जीभेवर थोडे मीठ टाकुन त्याला ब्रशच्या साहाय्याने थोडे स्क्रब करा. यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करा. एक आठवडाभर दिवसातुन दोन वेळा असे करा. एक चमचा मीठ कोमट पाण्यात मिळवा आणि गुळण्या करा.

व्हीजीटेबल ग्लिसरीन
जीभेवर जमलेल्या घाण थराला काढण्यासाठी व्हीजीटेबल ग्लिसरीन एक चांगला उपाय आहे. यामुळे तोंडाचा कोरडेपणा आणि श्वासाचा वास दूर होतो. जीभेवर थोडे व्हीजीटेबल ग्लिसरीन ठेवा. मुलायम ब्रिस्टल असलेल्या ब्रशने हळु-हळू ब्रश करा. कोमट पाण्याने गुळणा करा.

Leave A Reply

Your email address will not be published.