जात पडताळणी प्रमाणपत्रे आता तात्काळ मिळणार, 7 ठिकाणी लवकरच नवीन कार्यालये !

0

मुंबई :एन पी न्यूज 24 – राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यातील सात ठिकाणी नवीन समिती कार्यालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पालघर, नाशिक, धुळे, किनवट, यवतमाळ, गोंदिया आणि चंद्रपूर अशा एकूण सात ठिकाणी नवीन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ होण्यासाठी पालघर, नाशिक, धुळे, किनवट, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर अशा सात ठिकाणी नवीन समिती कार्यालये स्थापन करण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या नवीन समिती कार्यालयांमुळे समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा गतीने निपटारा होऊन, विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर अर्जदारांना वेळेत प्रमाणपत्र मिळतील, तसेच निवडणूक व सेवा विषयक प्रकरणांचाही वेळेत मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या समित्यांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ (अधिकारी-कर्मचारी वर्ग) निर्माण करण्यात येणार आहे.

कार्यक्षेत्राची पुनर्रचना करणार –

ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व गडचिरोली या आठ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या आठ पडताळणी समित्यांव्यतिरिक्त पालघर, नाशिक, धुळे, किनवट, यवतमाळ, गोंदिया आणि चंद्रपूर अशा एकूण सात ठिकाणी नवीन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.