चांदी प्रतिकिलो 50000, तब्बल 7 वर्षानंतर ‘चकाकी’ ! सोनं एका दिवसात 1 हजारांनी ‘महाग’

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – सोन्याचांदीच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. मंगळवारी चांदीचा दर प्रतिकिलो 50 हजार रुपयांपेक्षा जास्त झाला. 40,600 रुपयांच्या दहा ग्रॅमच्या किंमतीवर एक हजारांच्या वाढीसह सोन्याचा भावही वाढला. बुलियन तज्ज्ञ राहुल गुप्ता म्हणाले की, मंदीच्या काळात या दोन धातूंकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिल्याने सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

मंगळवारी एक किलो चांदीची किंमत 50, 500 रुपयांवर पोहोचली. चौक सराफा व्यावसायिका विशाल गुप्ता म्हणाले की, एप्रिल 2013 मध्ये एक किलो चांदीची किंमत 50 हजार रुपये होती. यानंतर चांदीच्या भावात स्थिर घसरण दिसून येत आहे. ते म्हणाले की चांदीची किंमत प्रति किलो 38 हजार रुपयांवर आली होती. परंतु या अर्थसंकल्पात अडीच टक्क्यांची आयात शुल्काची वाढ सोने आणि चांदीच्या किंमतींवर दिसून येते. त्यांनी सांगितले की, 17 जुलै 2019 रोजी चांदीच्या किंमतीने उच्चांक गाठला आणि 41 हजार रुपये प्रति किलोचा आकडा पार केला. यानंतर चांदीचे दर सतत वाढत राहिले.

एका दिवशी एक हजार इतका सोन्याचा दर वाढला –

सोमवार ते मंगळवार दरम्यान सोन्याच्या किंमतीत सुमारे एक हजार रुपयांची प्रति दहा ग्रॅम वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत दहा ग्रॅम सोन्याची किंमत 40 हजार 600 रुपयांवर पोचली. आठवड्याभरापूर्वीही सोन्याने 40 हजारांची किंमत ओलांडली आहे. पण त्यानंतर त्यात सुमारे एक हजार रुपयांची घसरण नोंदली गेली.

Leave A Reply

Your email address will not be published.