अहमदनगर : वाळूतस्करी करणारी 75 लाखांची वाहने पकडली

0

एन पी न्यूज 24 – श्रीगोंदा तालुक्यातील आडगाव शिवारातील देव नदीपात्रात बेकायदा सुरू असलेल्या वाळूतस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत 75 लाख पन्नास हजाराची वाहने जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अक्षय सुनिल राहींज (वय- २४ वर्षे, रा. राहींज वस्ती, काष्टी, ता- श्रीगोंदा), राहुल भास्कर लांडगे (वय २३ वर्षे, रा. गजाननवाडी, काष्टी, ता. श्रीगोंदा), महेश राजेन्द्र भैलूमे (वय- २२ वर्षे, रा. आढळगांव, ता. श्रीगोंदा), भाऊसाहेब जयशिंग सकट (वय २८ वर्षे, रा. सुरोडी, ता. श्रीगोंदा) यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे शिवारात देवनदीवरील तलाव पात्रामध्ये काही इसम जेसीबी मशिनचे सहाय्याने बेकायदा व अवैधरित्या गौण खणिज वाळूचा उपसा करुन विक्री करण्याकरीता ट्रक व ट्रॅक्टरचे सहाय्याने वाहतूक करीत आहेत. आता गेल्यास मिळून येतील, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/संदीप पाटील, पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, पोना/रविन्द्र कर्डीले, पोकॉ/रोहीत मिसाळ, प्रकाश वाघ, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे अशांनी मिळून खासगी वाहनाने आढळगांव शिवारातील देव नदी तलावाजवळ जावून खाजगी वाहने तलावापासून काही अंतरावर उभी करुन पायी चालत जावून रात्री ०२/०० वा. चे सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम दोन जेसीबी मशिनचे सहाय्याने वाळू उपसा करुन ट्रॅक्टर व ट्रकमध्ये भरीत असताना दिसले.

त्यावेळी पोलीस आल्याची चाहूल लागल्याने एक जेसीबी चालक व दोन इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. त्यांचा पाठलाग केला. परंतु, ते मिळून आले नाहीत. एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर व एक ट्रकवरील चालकांना पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांचे नावे, पत्ते अक्षय सुनिल राहींज (वय- २४ वर्षे, रा. राहींज वस्ती, काष्टी, ता- श्रीगोंदा), राहुल भास्कर लांडगे (वय २३ वर्षे, रा. गजाननवाडी, काष्टी, ता. श्रीगोंदा), महेश राजेन्द्र भैलूमे (वय- २२ वर्षे, रा. आढळगांव, ता. श्रीगोंदा), भाऊसाहेब जयशिंग सकट (वय २८ वर्षे, रा. सुरोडी, ता. श्रीगोंदा) असे असल्याचे सांगीतले. सदर ठिकाणाहून तलाव पात्रातून दोन जेसीबी मशिन, दोन ट्रॅक्टर, एक ट्रक, दोन मोटार सायकल व सात ब्रास शासकिय वाळू असा एकूण ७५,५०,०००/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी अटक केलेले चार जण व पळून गेलेले वाहनांचे माल संतोष सुपेकर, संतोष मिसाळ, मंगेश मोटे, जेसीबी मशिनवरील अज्ञात चालक/मालक व दोन मोटारसायकलवरील दोन अज्ञात चालक असे एकूण १० आरोपींविरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.