नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे

0

एन पी न्यूज 24 – नोकरी करत असलेल्या महिलांना स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, असे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने खुप धोकादायक ठरू शकते. घर तसेच कामाच्या ठिकाणच्या जबाबदाèया पार पाडताना थोडा तरी वेळ व्यायामासाठी काढायला हवा. फिटनेस सांभाळण्यासाठी अतिशय सोपे आणि कमी वेळ लागणारे काही व्यायाम प्रकार असून ते केल्यास आरोग्य चांगले राहू शकते.

हे सोपे व्यायाम करा

* खुर्चीवर बसावे. पायांना ३० सेकंद सरळ ठेवावे. असे थोड्या-थोड्या वेळाने करा. यामुळे पायांमध्ये सूज किंवा थकवा येत नाही. पायाची दुखणी बरी होतात.

* खुर्चीवर बसून पायांना सरळ ठेवा. अंगठ्याला जमिनीवर टेकवून एकवेळा क्लॉकवाइज आणि नंतर अँटीक्लॉकवाइज फिरवा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो.

* खुर्चीवर बसून डोक्याला डाव्या हाताने उजव्या बाजूला घेऊन जा. १५ ते २० सेकंद असेच ठेवल्यानंतर डोक्याला उजव्या हाताने डाव्या बाजूला न्या.

* व्यायाम करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करावे. यामुळे लवचिकता वाढते.

* दररोज वॉकिंग करा. यामुळे खांदे, शरीराच्या खालचा भाग, मांड्या, पायाचे स्नायू सक्रिय होतील.

* जंपिंग जॅक व्यायाम करा. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. वजन कमी होते.

आरोग्यविषयक वृत्त –

  • तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे
  • शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यां