सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’

0

एन पी न्यूज 24 – सौंदर्य आणि आहार यांचा खुप निकटचा संबंध आहे. परंतु, हेच
अनेक महिलांना माहित नसल्याने त्या आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ विविध
सौंदर्यवृद्धीसाठी उपाय करत असतात. यामुळे अनेकदा या उपायांचा परिणाम दिसून
येत नाही. सुंदर त्वचेसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे. जर सौंदर्य
वाढवायचे असेल आणि दिर्घकाळ टिकवायचे असेल तर कोणता आहार घ्यावा, याविषयी आपण
जाणून घेवूयात.

*द्रवरूप आहार*
शरीरातील विषाक्त पदार्थ काढण्यासाठी पाणी खुप उपयोगी आहे. यासाठी हर्बल टी,
सूप, फळ आणि भाज्यांचा ज्यूस पिणे लाभदायक ठरते. यामुळे त्वचा उजळते तसेच
सुंदरही होते. दिवसभर नियमितपणे कमीत कमी दीड लिटर पाणी प्यायला पाहिजे.

*पौष्टिक सलाड *
उजळ त्वचेसाठी हिरव्या सलाडचा आहारात समावेश करावा. यातील बीटा कॅरोटीन,
व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई तसेच त्वचा निरोगी राखणारे अँटिऑक्सिडंट्स
असतात. अ‍ॅव्होकॅडोतील व्हिटॅमिन ई सौंदर्य वाढवते.

*भरपूर प्रोटीन *
आहारात नियमितपणे प्रोटीन घ्यावे. यासाठी पांढरे मटण, मासे, अंडी, दूध, दही,
पनीर, सोयाबीन आणि डाळींचा आहारात समावेश करा. यामुळे त्वचेच्या पेशींच्या
निर्मितीमध्ये वाढ होते.

*व्हिटॅमिन सी *
त्वचेचा लवचिकपणा आणि कोलोजन